Rajiv Gandhi 75th Birth Anniversary: भारताच्या पहिले युवा पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी 5 आश्चर्यकारक गोष्टी
Rajiv Gandhi (Photo Credits: Getty)

Rajiv Gandhi Birth Anniversary 2019: वयाच्या 40 व्या वर्षी भारताच्या पंतप्रधान पदाच्या गादीवर विराजमान झालेले राजीव गांधी (Rajiv Gandhi) हे सर्वात पहिले युवा पंतप्रधान होते. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या आग्रहास्तव राजकारण सामील झालेले आणि पुढे जाऊन पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणा-या राजीव गांधी यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्यांची राजकारणातील कारकिर्द जरी फार मोठी नसली तरीही त्यांनी राजकारणात खूप चांगले आणि उल्लेखनीय असे योगदान दिले आहे.

अशा या धुरंधर राजकारण्याविषयी अशा काही 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्यापैकी ब-याच जणांना माहित नसतील. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्या 5 महत्वपुर्ण गोष्टी:

1. राजीव गांधी यांचा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधी यांच नाव त्यांचे आजोबा म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु(Pandit Jawaharlal Nehru) यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव. त्यामुळे इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ‘राजीव’ ठेवण्यात आले.

2. राजीव गांधी यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता. तर विज्ञान आणि इंजिनीअरींगकडे त्यांचा कल जास्त होता. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडायचे. त्यांना फोटोग्राफी करण्याचा आणि रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.

3. राजीव गांधी फ्लाईंग क्लबचे सदस्य होते. त्यांनी तेथे सिव्हिल एव्हिएशनचे प्रशिक्षणही घेतले. 1970 साली एअर इंडियामध्ये कामाला सुरुवात केलेल्या राजीव गांधींनी 1980 साली राजकारणात प्रवेश केला.

4. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 542 पैकी 411 जागांवर घसघशीत विजय मिळवला होता. 1984 साली काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल हा आतापर्यंतचा ऐतिहासिक निकाल म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा- Rajiv Gandhi 75th birth anniversary: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी घेतले राजीव गांधी यांच्या समाधीचे दर्शन

5. बोफोर्स घोटाळा, भोपाळ दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनचं देशाबाहेर पलायन इत्यादी गोष्टींवरुन राजीव गांधी यांच्यावर आरोपही झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आधी मंत्रिमंडळातून बाहेर, मग काँग्रेसमधूनही त्यांना बाहेर काढण्यात आले.

21 मे 1991 रोजी लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधींची हत्या केली. त्यांच्या हत्येने संपुर्ण भारतात तीव्र संतापाची लाट उसळली, तर काँग्रेस समर्थकांवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. आज जरी राजीव गांधी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण लोकांच्या कायम स्मरणात राहिल.