Rajiv Gandhi 75th Birth Anniversary: ANI)

Rajiv Gandhi Birth Anniversary 2019: गांधी घराण्याची राजकारणातील कारकिर्द खूपच मोठी आहे. त्यात 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर त्यांचेच सुपुत्र राजीव गांधी (Rajiv Gandhi) पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. भारतातील राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करणा-या राजीव गांधी यांची 75 वी जयंती. 21 मे 1991 मध्ये निवडणूकांदरम्यान श्रीपेरम्बदूर मध्ये बॉम्बहल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली होती.

त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला मुलगा राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मुलगी प्रियंका गांधी  वडेरा (Priyanka Gandhi Vadra) यांच्यासह दिल्लीतील वीरभूमीवर त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनीही राजीव गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ANI ट्विट:

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटच्या माध्यमातून राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राजीव गांधी देशातील पहिले युवा पंतप्रधान होते. राजीव गांधी विषयी असे सांगितले जाते की, लोक त्यांच्या प्रामाणिकतेवर संतुष्ट होते. त्यांना असा विश्वास होता की राजीव गांधी देशाला खूप पुढे आणि प्रगतीपथावर घेऊन जातील.

हेही  वाचा- Rajiv Gandhi 75th Birth Anniversary: राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आठवडाभर दिला जाणार त्यांच्या आठवणींना उजाळा

खूप कमी काळासाठी राजीव गांधी राजकारणात कार्यरत राहिले असले तरीही त्यांनी त्या दरम्यान राजकीय कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचा काही अंशी परिणाम हा आज दिसून येतोय अस म्हणायला हरकत नाही. अशा या धुरंधर राजकारण्याला लेटेस्टली कडून भावपुर्ण श्रद्धांजली.