लष्करी जवानांच्या योगदिनाच्या 'त्या' फोटोवरील ट्विट नंतर राहुल गांधी सोशल मीडियात ट्रोल
Rahul Gandhi (Photo Credits-Twitter)

आज देशासह जगभरात योगदिन अगदी उत्साहात साजरा केला गेला. देशात विविध ठिकाणी योगदिनानिमित्त योगाच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळा, कॉलेजेस मध्येही योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले. योगदिनाच्या या उत्साहात सेलिब्रेटीही कुठे मागे नव्हते. इतकंच नाही तर योग दिनाच्या या उत्साहात भारतीय जवानही सहभागी झाले. भारतीय लष्करी जवानांनी श्वानपथकासह योगासने केली. मात्र योगदिनाचा हा उत्साह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी फारसा रुचलेला दिसत नाही. कारण भारतीय लष्कर आणि श्वानपथक एकत्र योगा करत असतानाचा फोटो ट्विट करत राहुल गांधी यांनी 'न्यू इंडिया' (New India) असे फोटोला कॅप्शन दिले. राहुल गांधी यांनी योगदिनाची उडवलेली ही खिल्ली त्यांच्या चांगलीच अंगलगट आली आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर नेटकरी चांगलेच संतापले असून त्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट:

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

राहुल गांधी यांच्या या दोन शब्दांमुळे नेटकऱ्यांसह भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.