PM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (26 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75 व्या सत्राला संबोधित करणार आहेत. या महासभेला संबोधित करणारे पीएम मोदी पहिलेच वक्ता असणार आहेत. या करिता त्यांच्यासाठी आधीच वेळ ठरवण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 6.30 वाजता संबोधित करतील. तसेच शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सुद्धा UNGA मध्ये भाषण देणार आहेत.(PM Modi Interacts with Fitness Influencers: फिट इंडिया मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलिंद सोमण याच्याशी साधला संवाद; पहा फिटनेसबद्दल काय म्हणाला आयर्न मॅन)
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या UNGA ची थीम `The future we want, the United Nations we need, reaffirming our collective commitment to multilateralism - confronting the COVID-19 through effective multilateral action'. असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर इमरान खान सुद्धा भाषण देणार आहेत. इमरान खान यांचे भाषण भारतीय वेळेनुसार रात्री 10.15 मिनिटांनी असणार आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी)
PM Narendra Modi to address the United Nations General Assembly tomorrow evening. pic.twitter.com/sXMi979xia
— ANI (@ANI) September 25, 2020
तसेच सध्याच्या महासंकटामुळे जगातील बहुतांश कार्यक्रम हे व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून पार पाडले जात आहेत. अशातच संयुक्त राष्ट्र महासभेचे 75 वे सत्र सुद्धा याच पद्धतीने होत आहे. नरेंद्र मोदी यांचे संबोधन न्यूयॉर्क मधील UNGA हॉलमध्ये आधीच रेकॉर्डिंग करण्यात आलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटच्या माध्यमातून होणार आहे.
या सत्रात भारतासमोर दहशतावादासह अन्य काही महत्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थितीत केले जाऊ शकतात. मोदी दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याबद्दल जागतिक कारवाई करण्यासाठी समित्यांमधील संस्था व व्यक्तींची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेवर भर देऊ शकतात.(PM Narendra Modi Foreign Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून केला 58 देशांचा दौरा)
तसेच विकास आणि जलवायु परिवर्तन संबंधित मुद्द्यांवर ही भारत आपला सक्रिय भागीदारी कायम ठेवणार आहे. या व्यतिरिक्त भारत जगातील 150 हुन अधिक देशांसाठी कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकिय मदतीचा मुद्दा समोर ठेवू शकतो. त्याचसोबत अन्य काही मुद्दे ही यावेळी समोर ठेवले जाऊ शकतात.