Fake News | Representational image (Photo Credits: pxhere)

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्टचेक (PIB Fact Check) ट्विटर हँडलने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याबद्दल खोट्या बातम्या (Fake News) पसरवणाऱ्या YouTube चॅनलबद्दल माहिती दिली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट @PIBFactCheck ने मंगळवारी (20 डिसेंबर) केलेल्या ट्विटनुसार 'न्यूज हेडलाइन्स' नावाच्या YouTube चॅनेलचे जवळपास 10 लाख सदस्य आहेत आणि त्यांनी पोस्ट केलेले सर्व व्हिडिओ आतापर्यंत 32 कोटी वेळा पाहिले गेले आहेत. पण या चॅनलवर भारतीय पंतप्रधान, भारताचे सर्वोच्च न्यायालय, भारताचे CJI आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

पीआयबीने पुढे म्हटले की, या YouTube चॅनलबद्दल PIB Fact Check ने पोस्ट केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये एका बनावट बातमीचा उल्लेख केला आहे, त्यानुसार भारताच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि देशभरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही फेक न्यूज एक वर्षापूर्वी 'न्यूज हेडलाईन्स' चॅनलवर अपलोड करण्यात आली होती आणि जी 20,000 हून अधिक वेळा पाहिली गेली आहे.

ट्विट

पीआयबीने मंगळवारी दावा केला की 22.6 लाखांहून अधिक सदस्य असलेल्या 'सरकारी अपडेट' या अन्य YouTube चॅनेलवरील जवळजवळ सर्व सामग्री बनावट आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, या चॅनलवर भारत सरकारच्या विविध योजनांबद्दल खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.

ट्विट

ट्विट

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आणखी एक YouTube चॅनल बनावट असल्याचे आढळले, ज्याचे सुमारे 65,000 सदस्य आहेत. या चॅनलवर प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूचे खोटे दावे केले जातात आणि सरकारी निर्णयांबाबत खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात.