Pfizer ने आपत्कालीन मंजूरीसाठी केलेला अर्ज मागे घेतल्याची Reuters यांची माहिती
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Coronavirus Vaccine: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कंपन्यांनी लस विकसित केली आहे. अशातच डब्लूएचओ (WHO) कडून फायजर (Pfizer) बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. तर फायजर बायोटेक लसीला इंग्लंड मध्ये पहिल्यांदा मान्यता दिली गेली होती. पण भारतात फायजर कंपनीच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला होता. परंतु तोच अर्ज आता फायजर कंपनीने मागे घेतला आहे.(COVID-19 Vaccination: भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेतील दुसरा डोस 13 फेब्रुवारी पासून दिला जाणार)

फायजर कंपनीकडून याबद्दल आपली भुमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, फायजरच्या आपत्कालीन वापरासाठी येत्या 3 फेब्रुवारीला भारतीय औषध नियामक प्राधिकरणाच्या विशेष तज्ञांसोबत बैठक पार पडली. त्यानुसार बैठकीतच फायजर कंपनीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. फायजर कंपनीच्या प्रवक्तांनी असे ही म्हटले की, फायझरचा प्राधिकरणाशी संवाद कायम राहील आणि भविष्यात ही लस उपलब्ध करुन देण्यासाठी मान्यता विनंती पुन्हा जारी केली जाईल. त्यांनी पुढे म्हटले की, फायजर आपली लस भारत सरकारने वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आपत्कालीन उपयोग प्राधिकरणाद्वारे आवश्यक मार्गाचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध आहे.(Serum Institute 100 देशांना करणार कोरोना लसीचा पुरवठा; UNICEF सोबत केला करार)

Tweet:

दरम्यान, भारतात  कोरोनावरील दोन लसींसह लसीकरण सुरु करण्यात आले आहे. भारतात सध्या ऑक्सफोर्डची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. त्या आधारावर  16 जानेवारी पासून लसीकरण मोहिम देशात राबवली जात आहे.  देशात आतापर्यंत 49,59,445 लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. कोरोनाच्या परिस्थिती बद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती नियंत्रणात आहे.