ओडिशा उच्च न्यायालयाने (Orissa High Court) मुख्य सचिवांना पोस्टमॉर्टम अहवाल (Post-Mortem Reports) आणि प्रिस्क्रिप्शन (Prescriptions) कॅपिटल अक्षरांमध्ये (Capital Letters) किंवा सुवाच्छ हस्तलेखनात लिहिण्याची (Doctors Handwriting) सूचना देणारे निर्देश राज्यभरातील डॉक्टरांना (Doctors) जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्पदंशाने झालेल्या मृत्यूशी संबंधित पोस्टमॉर्टम अहवालाचा समावेश असलेल्या खटल्यात हायकोर्टाने 4 जानेवारी रोजी हा निर्णय दिला. तहसीलदारांनी नुकसान भरपाईची याचिका फेटाळल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी न्यायालयाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यावर कोर्टामध्ये खटला सुरु होता.
डॉक्टरांचे चिठ्ठीतील हस्ताक्षर आकलनापलीकडचे
खटल्याच्या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती एस के पाणिग्रही यांच्या नेतृत्वाखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने शवविच्छेदन अहवालांचा मसुदा तयार करताना डॉक्टरांकडून वैद्यकीय-कायदेशीर दस्तऐवजांच्या आकलनात अडथळा आणणाऱ्या अनेक प्रासंगिक दृष्टिकोन आणि बाबींवर जोर दिला. न्यायमूर्तींनी अशा अहवालांचा उलगडा करण्यात आणि निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात न्यायपालिकेलाही अडचणी येतात याकडे लक्ष वेधले. आपला रोख कायम ठेवत म्हटले की, अनेकदा डॉक्टरांचे प्रस्क्रिप्शन किंवा शवविच्छेदन अहवाल यांतील हस्ताक्षर आकलनापलीकडचे असते. ते समजून घेताना गोंधळ होतो. अर्थाच्याही चुका होतात. त्यापेक्षा ही अक्षरे जर कॅपीटल लेटर्समध्ये किंवा पूर्णपणे स्वच्छ हस्ताक्षर अथवा थेट टाईप करुन दिल्यास गोंधळ टळला जाईल, असेही कोर्टाने म्हटले. तसेच, सचिवांना राज्यातील डॉक्टरांना निर्देश देण्याचे आदेश दिले. (हेही वाचा, अहमदनगर मधील डॉक्टारांचे Prescription Viral; ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून औषधांसोबत दिला 'हा' खास सल्ला (See Pic) )
'प्रिस्क्रिप्शन नीट लिहा नाहीतर टाईप करुन द्या'
न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना राज्यभरातील सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना परिपत्रक जारी करण्याचे निर्देश दिले. सचिवांनी याबाबत परिपत्रक काढले असून त्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना औषधे लिहून देताना किंवा वैद्यकीय-कायदेशीर अहवालांचा मसुदा तयार करताना योग्य हस्तलेखन किंवा टाइप केलेले स्वरूप वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (हेही वाचा, केरळच्या डॉक्टरचं सुवाच्च अक्षरातील प्रिस्क्रिब्शन सोशल मीडीयात वायरल)
कोर्टाकडून याचिका निकाली
संबंधित डॉक्टर न्यायालयात हजर राहिल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक महिन्याच्या आत तहसीलदारांसमोर नव्याने म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी अधिकार्यांना कायद्यानुसार विचार करून त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. ओरिसा उच्च न्यायालयाचे हे पाऊल न्यायिक व्यवस्थेत प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट आणि समजण्यायोग्य वैद्यकीय दस्तऐवजीकरणाचे महत्त्व अधोरेखित करते.
डॉक्टरांकडून लिहून दिली जाणारी औषधांची चिठ्ठी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. कोर्टाने याही आधी याबाबत अनेकदा भाष्य केले आहे. सामान्य नागरिकांमध्येही डॉक्टरांच्या चिठ्ठीबाबत अनेक समज गैरसमज असतात. कधी कधी ते विनोधाचा विषयही ठरतात. जो डॉक्टरांची चिठ्ठी वाचू शकतो तो खरा शिक्षित असाही विनोद केला जातो. त्यामुळे डॉक्टरांची चिठ्ठी औषधांसोबतच आकलनाच्या पातळीवरही चर्चेत असते.