डॉक्टरांचे अक्षर हे अनेकदा चर्चेत असतं ते म्हणजे अव्यवस्थित लिहण्याच्या अंदाजावरून. दरम्यान असे असूनहि ते फार्मासिस्ट योग्यरित्या वाचतात. यावर ऑनलाईन अनेक मिम्स वायरल झाली होती. त्यांच्या लिखाणावर अनेकदा जोक केले जातात. पण सध्या सोशल मिडीयात वायरल होत असलेले एक प्रिस्क्रिब्शन डॉक्टरांच्या नेटक्या अक्षरामुळे चर्चेत आलं आहे. Dr Nitin Narayanan या केरळ मधील एका डॉक्टराचे हे प्रिस्क्रिब्शन आहे.
फेसबूक वर Bency SD या अकाऊंट वरून मागील आठवड्यात ते शेअर करण्यात आलं. बघता बघता ते वायरल झालं. पलक्कड मध्ये असणारा हा डॉक्टर लहान मुलांचा डॉक्टर आहे. नक्की वाचा: मुलांना हस्ताक्षर सुंदर काढायला शिकवायचे, वाचा 'या' टीप्स .
डॉक्टरांनी ब्लॉक लेटर्स मध्ये लिहलेले हे प्रिस्क्रिब्शन नीटनेटकं आहे. कुणीही ते सहज वाचू शकत आहे. मातृभूमीच्या रिपोर्ट्सनुसार, Dr Narayanan हे Thrissur Medical College मधून एमबीबीएस झाले आहेत. तर Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research मधून एमडी झालेले आहेत.