सुंदर हस्ताक्षर ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )
लहान मुलांचे हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी पालकांकडून नेहमी प्रयत्न केले जातात. तसेच सुंदर हस्ताक्षरामुळे समोरच्या व्यक्तीला आपण लिहिलेले वाचण्यास सोयीस्कर पडते. त्यामुळे मुलांमध्ये सुंदर हस्ताक्षर काढण्याची सवय लावयाची असेल तर 'या' टीप्स नक्की लक्षात ठेवा.
1. हस्ताक्षर सुधारा-
मुलांमध्ये हस्ताक्षर सुधाल्यावर जास्त गुण मिळतात असा समज असतो. मात्र हस्ताक्षर सुंदर असणे गरजे असून त्याबरोबर अभ्यास ही लक्षात राहणे खूप महत्वाचे असते. तसेच काही मुलांचे हस्ताक्षराकडे दुर्लक्ष झाल्याने परिक्षेच्या पेपरमध्ये गुण कापले जाण्याची शक्यता असते.
2. पेन्सिल पकडण्याची योग्य पद्धत-
मुलांना पेन्सिल पकडण्याची योग्य पद्धत ठेवावी. तर चुकीच्या पद्धतीने पेन्सिल पकडल्यास लिहिण्यास त्रास होऊन अक्षर ही खराब येते.
3. सर्व अक्षरे एकसारखी लिहिण्यास सांगा-
मुलांना सर्व अक्षरे समान अंतराची लिहिण्यास सांगावे. त्यामुळे अक्षर ही लक्षात राहून हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल.
4. नव्या शैलीतील हस्ताक्षर-
मुलांना हस्ताक्षर शिकवण्यासाठी त्यांच्या समोर विविध हस्ताक्षरांमधील लिहिलेली पुस्तके ठेवा. तसेच वहीच्या पानावर नवीन पद्धतीच्या अक्षराचे लेखन करण्यास सांगावे. यामुळे विविध हस्ताक्षरांमधील अक्षरांचा सराव मुलांकडून दररोज होईल.
5.लेखी प्रोजेक्टचा सराव-
आपल्या मुलांना लेखी प्रोजेक्टचा सराव अधिक करण्यास सांगावा. तसेच मुलांकडून हस्ताक्षर सुधारुन घेण्यासाठी त्यांना पत्र, ग्रिटिंग कार्ड अशा गोष्टी करण्यास प्रोत्साहन करा.