नीरव मोदी (Nirav Modi) याचे भारतातील प्रत्यार्पणास विरोध करणारे आपील इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे भारत सरकारचा नीरव मोदी याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात (Wandsworth Prison in London) असलेल्या नीरव मोदी याच्याकडे युकेमध्ये राहण्याचे कोणतेही कायदेशीर पर्याय शिल्लख राहिले नाहीत. त्यामुळे त्याला आता भारतात यावेच लागणार आहे.
नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण करावे असा निर्णय इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने आगोदरच दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला नीरव मोदी याने पाठिमागील महिन्यात युकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जे आता मोडीत निघाले आहे. (हेही वाचा, Bike Bot Scam: नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यापेक्षाही मोठा तब्बल 15,000 कोटींचा 'बाइक बॉट घोटाळा'; CBI कडून भांडाफोड)
वय वर्षे 51 असलेल्या नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने प्रकृतीचे कारण देत आपले भारताकडे प्रत्यार्पण होऊ नये अशी मागणी केली होती. न्यायालयाने सांगितले की, नीरव मोदीला त्याच्या आत्महत्या करण्याचा धोका नव्हता तर भारतात लागलेल्या मनिलॉन्ड्रींगच्या आरोपांना तोंड देण्यासाठी त्याचे प्रत्यार्पण त्याला जाचक वाटत होते. त्यामुळे तो कारणे पुढे करत होता.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा उघड झाल्यानंतर नीरव मोदी भारतातून पळून गेला होता. नीरव मोदी 13,000 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे.
ट्विट
Nirav Modi, wanted in India to stand trial on fraud and money laundering charges, loses bid to appeal against extradition in UK Supreme Court
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2022
PNB ची 7,000 कोटी रुपयांची फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावणे असे आरोप नीरव मोदी याच्यावर आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये भारतातील पोलीस त्याच्या मागावर होते. इंग्लंडमधून त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरु होते.