Mumbai-Ahmedabad Bullet Train: 2026 मध्ये सुरू होणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ट्रायल रन, 2027 पर्यंत सुरू होणार सेवा

या प्रकल्पामुळे 1.20 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे राज्यात 20,000 प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाले आहेत. सतोशी म्हणाले की, त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताकडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर भर दिला आहे

Mumbai-Ahmedabad Bullet Train: 2026 मध्ये सुरू होणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ट्रायल रन, 2027 पर्यंत सुरू होणार सेवा
Representational Image | Bullet Train (Photo Credits: PTI)

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) कॉरिडॉरच्या संपूर्ण गुजरात विभागासाठी ट्रायल रन 2026 मध्ये सुरू होईल आणि लोकांसाठी ही सेवा 2027 पर्यंत सुरू होईल, असे नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक एस सी अग्निहोत्री यांनी सांगितले. अग्निहोत्री पुढे म्हणाले की प्रकल्पाचा वाढलेला खर्च, भूसंपादनामुळे चुकलेली मुदत आणि कोविड-19 महामारी यासह इतर मुद्द्यांवर जपान सरकारशी चर्चा करून उपाय शोधले जातील.

एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक एस सी अग्निहोत्री आणि जपानचे भारतातील राजदूत सतोशी सुझुकी यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या स्थितीबाबत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये संपूर्ण मार्गाच्या बांधकामासाठी 100 टक्के नागरी कंत्राटे म्हणजेच 352 किमीची कंत्राटे भारतीय कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये आठ स्थानके असतील- वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती.

48,234 चौ.मी.च्या बिल्ट-अप क्षेत्रासह सुरत स्टेशन हे हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पातील सर्वात मोठ्या स्थानकांपैकी एक असेल. सुरत हे हिरे उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे स्टेशनचे आतील भाग हिऱ्याच्या पैलूंचे प्रतिनिधित्व करतील. सुरत स्टेशन 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि ते तयार होणारे प्रकल्पाचे पहिले स्टेशन असेल. (हेही वाचा: झारखंडमधील देवघर जिल्ह्यात 2 हजार फूट उंचीवर अडकले 50 पर्यटक; 2 महिलांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू)

या प्रकल्पामुळे 1.20 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे राज्यात 20,000 प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाले आहेत. सतोशी म्हणाले की, त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताकडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर भर दिला आहे. NHSRCL देशातील इतर अशा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांना तंत्रज्ञान पुरवठादार असेल. ते दिल्लीप्रमाणेच मेट्रो देशातील इतर मेट्रो प्रकल्पांनाही साली देत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2022 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).