भारत सरकारने जाहीर केला देशाचा नवा नकाशा, नव्या रुपात जम्मू-कश्मीर आणि लद्दाख दिसणार
Jammu Kashmir and Ladakh, with the map of India (Photo Credits: @PIBHomeAffairs)

जम्मू-कश्मीर मधून कलम 370 रद्द केल्यानंतर भारतासाठी हा ऐतिसाहिक निर्णय ठरला आहे. तसेच नुकतेच जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) आणि लद्दाख (Ladakh) यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारत सरकारकडून देशाचा नवा नकाशा जाहीर केला असून हे केंद्रशासित प्रदेश नव्या रुपात दिसून येणार आहे. नव्या लद्दाख संघ राज्य क्षेत्रात कारगिल आणि लेह असे दोन जिल्हे आहेत. तर जम्मू-कश्मीर राज्याच्या अन्य भाग हा नव्या जम्मू-कश्मीर राज्य संघ क्षेत्रात आहे.

1947 मध्ये जम्मू-कश्मीर मध्ये एकूण 14 जिल्हे म्हणजेच कठुआ, जम्मू, उधमपूर, रियासी, अनंतनाग, बारामुला, पुंछ, मीरपुर, मुजफ्फराबाद, लेह आणि लद्दाख, गिलगित, गिलगित वजार, चिल्हास आणि ट्रायबल टेरेटरी. मात्र 2019 मध्ये जम्मू-कश्मीरच्या राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांचे पुर्नगठन करण्यासाठी 28 जिल्हे तयार केले. या नव्या जिल्ह्यांची नावे-कुपवारा, बान्दीपुर, गंडेरबल, श्रीनगर, बडगाम, पुलवामा, शोपियान, कुलगाम, राजौरी, रामबन, डोडा, किश्तवार, साम्बा आणि कारगिल आहे.(जम्मू-कश्मीर आणि लद्दाख आता केंद्रशासित प्रदेश, नवे नियम लागू)

कारगिल जिल्ह्याला लेह आणि लद्दाख जिल्ह्यापासून विभक्त करण्यात आले होते. पण जम्मू-कश्मीर पुर्नगठन 2019 द्वारे नव्या लद्दाख संघ राज्य क्षेत्रात लेह आणि कारगिल जिल्हा सहभागी आहे. जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर  भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा साथ मिळाली. मात्र पाकिस्तान या निर्णयामुळे अधिक संतप्त झाल्याचे दिसून आले. देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढून ती आता 9 झाली आहे. एकूण 29 राज्यांचा आकडा 28 वर आला आहे.