भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल
भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी (LUC) एल-58 पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील भारतीय नौसेनेत दाखल झाली आहे.
भारतीय नौसेनेची ताकद वाढणार, मेक इन इंडिया निर्मिती लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी एल-58 नेवी मध्ये दाखल लँन्डिंग क्राफ्ट युटिलिटी (LUC) एल-58 पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील भारतीय नौसेनेत दाखल झाली आहे. हे जहाज आपल्या चालक दलाव्यतिरिक्त 160 सैनिकांना घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे. हे मार्क IV क्लासमधील आठवे आणि अखरचे जहाज आहे. नौसेनेत हे दाखल करतेवेळी कमांडर कृष्ण के. यादव यांनी जहाजापूर्वीच्या कमाडिंग अधिकाऱ्यांच्या रुपात याचे कमीशन वॉरंट वाचले. एल-58 च्या नौसेनेत सहभागी झाल्यानंतर आता भारताकडे कुम्भिर वर्गातील 3 एलसीयू आणि चतुर्थ श्रेणीतील 8 एलसीयू झाले आहेत. हे जहाच लढाऊ वाहने, युद्धातील टँकसह 900 टन वजनाचे सामान सुद्धा वाहून नेऊ शकणार आहे. जीआरएसईने हे जहाज 31 डिसेंबर 2020 ला नौसेनेला सोपवले होते.
एलसीयू 58 एक उभयचर जहाज आहे. जे आपल्या चालकशिवय 160 सैनिकांना घेऊन जाण्यास सक्षम आहे. तसेच विविध प्रकारची लढाऊ विमाने, मेन बॅटल टँक, बीएमपी, ट्रकच्या रुपात 900 टन वजन घेऊन जाऊ शकते. जहाजाची लांबी 63 मीटर असून याचे इंजिन 15 समुद्री मील (28 किमी प्रति तास) वेगाने चालण्यास सक्षम आहे. नौसेनेच्या प्रवक्तांनी असे म्हटले की, जहाजावर पाच अधिकारी आणि 50 नाविकांची एक उत्साही टीम तैनात आहे. कोलकाताची कंपनी जीआरएसई यांनी स्वदेशी रुपात डिझाइन आणि निर्मित करुन देशाला 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियनाच्या यशात मध्ये आणखी एक भर पडली आहे.(Hurun India Wealth Report 2020 जाहीर; देशात 4.12 कुटुंब कोट्याधीश; मुंबई यादीमध्ये अव्वल स्थानी)
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2021 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

