Kisan Special Parcel Train: 7 जुलै रोजी देवळाली ते दानापूर धावणार देशातील पहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन; भाजीपाला, फळांची होणार वाहतूक
Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा आणि फळ-भाज्यांचे दर कृत्रिमरित्या वाढवू नयेत, या हेतूने केंद्र सरकारने किसान स्पेशल पार्सल ट्रेन (Kisan Special Parcel Train) चालवण्याची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना ही गाडी चालवण्याची घोषणा केली होती. आता देशातील पहिली किसन स्पेशल पार्सल ट्रेन 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नाशिक जवळील देवळाली (Devlali) वरून दानापूर (Danapur) साठी सुटेल. केंद्रीय रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, ग्रामविकास व कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

दर आठवड्याला सुटणारी हे देवळाली-दानापूर किसान स्पेशल पार्सल ट्रेन उद्या देवळाली येथून सकाळी 11 वाजता सुटेल. 1519 कि.मी.चा प्रवास पार करून ही गाडी संध्याकाळी 6.45 वाजता दानापूरला पोहोचेल. या ट्रेनला त्याच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी एकूण 31.45 तास लागतील. या विशेष स्पेशल पार्सल ट्रेनमध्ये अशी उत्प्दाने समविष्ट असतील जी त्वरित नष्ट होतील, जसे की, भाजीपाला आणि फळे. या गाडीचा नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर असा मार्ग असेल.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रामुख्याने कृषी उत्पादनांसाठी ओळखला जातो. नाशिक आणि आसपासचा भाग हा मुख्यतः ताजा भाजीपाला, फळे आणि फुले यासह अनेक नाशवंत गोष्टींसाठी उत्पादनासाठी ओळखला जातो. ही उत्पादने प्रामुख्याने पटना, अलाहाबाद, कटनी आणि सतना या भागात नेली जातात. साप्ताहिक धावणाऱ्या या ट्रेनमुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Ram Temple In Ayodhya: राम मंदिर ट्रस्टला आतापर्यंत मिळाले 41 कोटी रुपयांचे दान)

या ट्रेनमधील कंटेनर हे फ्रीज सरकाहे असणार आहेत. याचा अर्थ, हे चालते फिरते कोल्ड स्टोरेज असेल. कसान रेल्वेचे उद्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा आहे. रेल्वेच्या मदतीने अल्प काळात देशाच्या कानाकोपऱ्यात फळे, फुले व भाजीपाला यासारख्या वस्तू नेऊन शेतकरी अधिकाधिक नफा कमवू शकतील.