International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पीएम मोदी यांच्याकडून M-Yoga App ची घोषणा, जनतेला दिला 'हा' सल्ला
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

International Yoga Day 2021 Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 जून) सकाळी सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित केले आहे. या वेळी नरेंद्र मोदी यांनी प्रथम योगा दिनाच्या शुभेच्छा देत म्हटले की, आज संपूर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत आहे. पण योगा हा एक आशेषा किरण कायम टिकून आहे. दोन वर्षांपासून जगभरातील लोक देशात आणि भारतात जरी मोठे कार्यक्रम आयोजित करु शकत नसतील पण या दिवसाच्या प्रति उत्साह कमी झालेला नाही.

देशवासियांना संबोधित करत पीएम मोदी यांनी म्हटले की, मी अपेक्षा करतो की, प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुदृढ राहावे. सर्वांनी एककजुटीने एकमेकांची ताकद बनूयात. योग आपल्याला तणावात बळ आणि निराशेपासून ते आशेचा किरण दाखवतो. कोरोनाच्या काळात योगामुळे शरीराला होणारे फायदे, आपली रोगप्रतिकारक शक्तीवर होणारे सकारात्मक प्रभाव यावर काही अभ्यास केला जात आहे.(Yoga Day 2021: केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Harsh Vardhan,राष्ट्रपती Ramnath Kovind ते Nitin Gadkari यांनी आज योगाभ्यास करत दिल्या नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा)

योगाचे महत्व सांगताना मोदी यांनी म्हटले की, जगातील बहुतांश देशात योग दिवस हा त्यांचा सांस्कृतिक वारसा नाही आहे. या मुश्किल काळात, ऐवढ्या मोठ्या संकटात ते विसरु शकत होते. उलट लोकांचा योगा दिनानिमित्त उत्साह वाढला गेला आहे.

ज्यावेळी कोरोनाच्या अदृष्य व्हायरसने जगात एन्ट्री केली होती तेव्हा कोणत्याच देशाकडे त्याच्या विरोधात लढण्यासाठी पुरेशी संसाधने नव्हती. आपण सर्वांनी पाहिले आहे की, अशा कठीण काळात योग आत्मबळ वाढवण्याचे एक माध्यम बनले आहे. योगामुळे लोकांचा विश्वास वाढला की, आपण कोरोनाच्या विरोधात लढू शकतो.

भारतातील ऋषींनी, देशाने जेव्हा आरोग्याबद्दल सांगितले म्हणजे याचा अर्थ असा नाही की, फक्त शारिरीक आरोग्य राहिलेले नाही. यासाठी योगामुळे आपले मन आणि आरोग्य नेहमीच निरोगी राहते. महान तमिळ संत श्री तिरुवल्लुवर जी यांनी असे म्हटले आहे की, जर एखादा आजार असेल तर त्याच्या मुळापर्यंत जा. आजारामागील कारण शोधून काढा. त्यानंतरच त्याच्यावर उपचार करा. योगा हाच मार्ग दाखवतो.(International Yoga Day 2021: भारतात लद्दाख च्या Pangong Tso lake पासून अमेरिकेच्या Times Square परिसरात आज योग दिनाचा उत्साह; पहा फोटोज)

सध्या मेडिकल सायन्ससुद्धा उपचारांसह Healing वर सुद्धा ऐवढा जोर देते आणि योगा यामध्ये उपचारकारक आहे. आज योगाच्या या पैलूमुळे जगातील विशेषज्ञ अनेक प्रकारचे योगा करत आहेत. यावर काम करत आहेत. जेव्हा भारताने युनायटेड नेशन मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यामागे कारण होते की, योगाचा अभ्यास संपूर्ण जगात सुलभ व्हावा. आज याच दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र, डब्लूएचओसह मिळून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

योगाच्या प्रति लोकांना प्रोत्साहित करत पीएम मोदी यांनी म्हटे की, आता जगाला M-Yoga अॅपची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योगाचे शिक्षण देणारे काही व्हिडिओ देशातील विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या आधुनिक टेक्नॉलॉजी आणि प्राचीन विज्ञानाच्या फ्युजनचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मला पूर्ण विश्वास आहे की. M-Yoga अॅप, योगाचा विस्तार संपूर्ण जगभारत करण्यासह One World, One Health चा प्रयत्न यशस्वी होण्यास मदत करेल. कोणतेही ठिकाण असो, कोणतीही परिस्थिती असो, कितीही वय असो प्रत्येकाला योगामुळे कोणाते ना कोणती मदत होणार आहे.