
Indian Railway: रेल्वेने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार बस आणि मेट्रो मध्ये महिलांसाठी जशी वेगळी सीट असते त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेत सुद्धा महिसांसाठी आरक्षित सीट असणार आहे. भारतीय रेल्वेकडून आता लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना बर्थ रिजर्व असणार आहेत.(मुंबई सह 6 मेट्रो स्ट्रेशन मध्ये 20 डिसेंबर पासून ‘At-Risk’ राष्ट्रांमधून येणार्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट साठी प्री बुकिंग बंधनकारक)
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे म्हटले की, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना आरामदायी प्रवास करण्यासाठी रिजर्व बर्थ निर्धारित करण्यासह अन्य काही सुविधा सुद्धा सुरु करणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी असे ही म्हटले की, मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित असणार आहे, गरीब रथ, राजधानी, दुरांतोसह पूर्णपणे वातानुकूलित एक्सप्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोच मध्ये सहा बर्थ महिला प्रवाशांसाठी आरक्षित केले आहे.(Indian Citizenship: भारत खरच राहण्यायोग्य देश आहे? 7 वर्षांत 8.5 लाखांहून अधिक देशवासीयांनी सोडले त्यांचे नागरिकत्व)
प्रत्येक स्लीपक कोचच्या सहा ते सात लोअर बर्थ वातानुकूलित 3 टियरच्या कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित 2 टियर कोचमध्ये तीन ते चार लोअर बर्थ वरिष्ठ नागरिक, 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिला प्रवाशी व गर्भवती प्रवाशांसाठी आरक्षित करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री म्हणाले, 'गाड्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 'पोलीस' आणि 'सार्वजनिक सुव्यवस्था' हे भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत राज्याचे विषय आहेत, तथापि, रेल्वे संरक्षण दल (RPF) GRP आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना उत्तम सुरक्षा प्रदान करतील.'
यासोबतच रेल्वे आणि स्थानकांवर महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपीच्या मदतीने रेल्वेकडून पावले उचलली जात आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी 'मेरी सहेली' हा संपूर्ण भारत उपक्रम सुरू केला होता, ज्याचा उद्देश रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे.