COVID 19 Test | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

ओमिक्रॉनच्या (Omicron)  दहशतीच्या पार्श्वभूमीवर भारताकडून 12 देशांना अ‍ॅट रिस्क (t-Risk’) राष्ट्राच्या यादींमध्ये टाकलं आहे. आता या राष्ट्रातून येणार्‍यांना अजून एक नियम लावण्यात आला आहे. येत्या 20 डिसेंबर पासून या अ‍ॅट रिस्क देशांमधून येणार्‍यांना विमानतळावर आरटी पीसीआर टेस्टचं प्री बुकिंग (RT PCR Test Pre Booking)  बंधनकारक करण्यात आलं आहे. हा नियम मुंबई (Mumbai) सह सहा मेट्रो स्टेशन साठी लागू करण्यात येणार आहे. एविएशन मिनिस्ट्री कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली (Delhi) , कोलकाता (Kolkata), चैन्नई (Chennai), हैदराबाद (Hyderabad), बेंगलूरू (Bengaluru) मध्ये हा नियम लागू होणार आहे.

केंद्र सरकारने आता DGCA ला एअरलाईन्सला अ‍ॅट रिस्क देशातून या सहा मेट्रो सिटीज मध्ये येणार्‍या प्रवाशांनी आरटी पीसीआर टेस्ट साठी नोंदणी केली आहे की नाही? हे तपासण्याच्याही सूचना केल्या आहेत. जर प्रवाशांना प्री बुकिंग साठी कोणती समस्या येत असेल तर त्यांच बोर्डिंग रोखलं जाऊ शकत नाही पण विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना टेस्टिंग साठी घेऊन जाणं हे एअरलाईन्सचं काम असणार आहे. हे देखील वाचा: Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक .

ओमिक्रॉनचा धोका आणि भारतातील त्याची वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मिटिंग घेतली आहे. 6 डिसेंबरला केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. एअर सुविधा या भारत सरकारच्या पोर्टल मध्येही त्यानुसार बदल केले जाणार आहेत. किमान 14 दिवस आधी ज्यांचा अ‍ॅट रिस्क देशांमध्ये वावर झाला आहे त्यांना हा नियम बंधनकारक असणार आहे.

आजपासून मुंबई विमानतळावर देखील होणार्‍या टेस्टचे दर कमी करण्यात आले आहेत. आजपासून 4500 पैकी 1975 रूपयांत टेस्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे.