Mumbai Airport वर Rapid RT-PCR Test च्या दरात कपात; नवे दर 4500 वरून 1975  रूपये
Passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai (Photo Credit: PTI)

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) वर रॅपिड आरटी पीसीआर टेस्ट (Rapid RT-PCR Test) साठी आकारण्यात आलेल्या किंमतींवरून अनेकांनी तक्रारी नोंदवल्यानंतर आता अखेर त्यांच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली असून आता मुंबई विमानतळावर टेस्टसाठी कमाल दर 1975 रूपये करण्यात आले आहेत. मंगळवार(14 डिसेंबर) च्या रात्री सरकारकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) नवे दर आज (15 डिसेंबर) पासून लागू केले जाणार आहेत.

मागील आठवड्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयआरएस ऑफिसर डॉ. सुधाकर शिंदे यांना मुंबई विमानतळावर रॅपिड आरटी पीसीआर टेस्टचे दर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉ. शिंदे हे राज्यात Price Regulation Committee चे आणि महात्मा फुले जनआरोग्य मिशनचे ते प्रमुख आहेत. हे देखील वाचा: Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक .

राज्य सरकारच्या माहितीनुसार, Abbot ID आणि thermo fisher accula वापरून केल्या जाणार्‍या टेस्टसाठी 1975 रूपये कॅप लावण्यात आली आहे. तरT Tata MD 3 Gene Fast पद्धतीने एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, हॉस्पिटल, क्वारंटीन क्लिनिक्स, फिव्हर क्लिनिक्स मध्ये टेस्टचे दर 975 रूपये करण्यात आले आहेत. याद्वारा रूग्ण कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही हे समजण्यास केवळ 15 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो.

सध्या पूर्ण लसवंतांनाही कोरोना होत असल्याने वाढत्या ओमिक्रॉन च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणार्‍यांची हमखास कोविड टेस्ट करून त्यांना पुढे पाठवले जात आहे. पण एकाच कुटुंबातील अनेकजण प्रवास करत असतील तर अशांना विमानतळातील चाचण्यांचे दर खिशाला मोठा फटका देणार्‍या ठरत होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून मुंबई विमानतळावरील दरांवरून संताप व्यक्त केला जात होता. देशातील सर्वाधिक टेस्टचे दर मुंबई विमानतळावर होते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खाजगी लॅब्सचे देखील दर कमी केले आहेत.