रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता Reservation शिवाय सुद्धा करता येणार प्रवास
भारतीय रेल्वे (File Photo)

कोरोनाची परिस्थिती कायम असली तरीही प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही रेल्वेकडून प्रवासासाठी नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात अनआरक्षित ट्रेन सुरु करण्याचा विचार केला आहे. यामुळे दिल्ली-एनसीआरसह सहारनपुर, अमृतसर, फिरोजपुर आणि फजिल्कासह काही ठिकाणी प्रवास करणे सोईस्कर होणार आहे. 5 एप्रिल पासून बहुतांश आरक्षित ट्रेनचा मार्ग सोपा होणार आहे. उत्तर रेल्वेने एकूण 71 अनराक्षित मेल आणि एक्सप्रेस ट्रेन कोणत्या असणार त्याची यादी जाहीर केली आहे.(Mumbai-Ahmedabad-Mumbai Tejas Express आजपासून महिनाभरासाठी स्थगित)

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत शनिवारी याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेत वाढ करत येत्या 5 एप्रिल पासून 71 अनारक्षित ट्रेनची सुरुवात करणार आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव सुद्धा त्यांना घेता येणार आहे. ट्विटमध्ये एक लिंक दिली आहे त्यामध्ये संपूर्ण ट्रेनबद्दल माहिती दिली गेली आहे.(6EBagport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo ने सुरु केली Door-to-Door Baggage Transfer Service; जाणून घ्या काय असेल शुल्क)

Tweet:

कोविडच्या कारणामुळे अनारक्षित ट्रेन या स्पेशल ट्रेनच्या नावाने धावणार आहेत. यासाठी ट्रेनचे दर पॅसेंजर रेल्वेप्रमाणेच स्वस्त नसणार आहे. तर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसारखे त्याचे भाडे असणार आहे. रेल्वेच्या मते सहारनपुर-दिल्ली जंक्शन, फिरोजपुर कैंट-लुधियाना, फजिल्का-लुधियाना, बठिंडा-लुधियाना, वाराणसी-प्रतापगढ़, सहारनपुर-नई दिल्ली, जाखल-दिल्ली जंक्शन, गाजियाबाद-पानीपत, शाहजहांपुर-सीतापुर, गाजियाबाद-मुरादाबाद सह अन्य काही शहरांसाठी अनारक्षित ट्रेन चालवल्या जाणार आहेत.