महाराष्ट्रासह देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्याने आता आयआरसीटीसी ने मुंबई-अहमदाबाद-मुंबई (Mumbai-Ahmedabad-Mumbai) दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस (Tejas Express) थांबवली आहे. आज 2 एप्रिल पासून पुढील महिनाभर धावणारी तेजस एक्सप्रेस आता खंडीत करण्यात आली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने सार्या ट्रेन्स थांबवल्या होत्या पण नंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असल्याचं पाहत कोविड गाईडलाईनचं पालन करत प्रवाशांना रेल्वे सेवा पुन्हा खुली करण्यात आली होती पण आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आयसीटीसीने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस थांबवली आहे. IRCTC-iPay, आयआरसीटीसीची नवी पेमेंट गेटवे सुविधा सुरू, तिकीट बुकिंग झालं सोप्प, रिफंड देखील तात्काळ मिळणार.
तेजस एक्सप्रेस ही आयआरसीटीसी ची सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे सेवा आहे. यामध्ये 312 चेअर कार आणि 56 एक्झिक्युटीव्ह चेअर कार अशी आसनव्यवस्था असते. पण सध्या मुंबई - अहमदाबाद मार्गावरील ही ट्रेन पुढील महिनाभरासाठी प्रवाशांच्या सेवेत नसेल. 82902/ 82901 अहमदाबाद -मुंबई सेंट्रल -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस चं वेळापत्रक आता पुढील महिन्यात पुन्हा प्रसारित केले जाऊ शकतं.
पश्चिम रेल्वे ट्वीट
कोराना वायरस (कोविड-19) के बढ़ते हुए केसों की संख्या को ध्यान में रखते हुए आईआरसीटीसी द्वारा संचालित ट्रेन संख्या 82902/ 82901 अहमदाबाद -मुंबई सेंट्रल -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस 02 अप्रैल 2021 से एक महीने के लिए निरस्त रहेगी।@RailMinIndia @drmbct @drmadiwr
— Western Railway (@WesternRly) April 1, 2021
महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अद्याप मुंबई लोकल बंद करण्याबाबतचा निर्णय झालेला नाही पण त्यावरही प्रवासी संख्येवर निर्बंध घातले जातील असे सांगण्यात आले आहे. काल राज्यात 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. राज्यात एकूण 366533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.