IRCTC Website Shut (Photo Credits: File Photo)

रेल्वे प्रवाशांसाठी आता ट्रेनचं तिकीट बूक करणं अत्यंत सोप्प झालं आहे. सोबत वेळेची देखील बचत होणार आहे. जर तुम्ही तिकीट देखील रद्द करत असाल तर त्याच रिफंड देखील तुमच्या अकाऊंट मध्ये तात्काळ येणार आहे. या सार्‍या गूड न्यूज मागील कारण आहे ते म्हणजे IRCTC ने त्यांच्या वेबसाईट मध्ये केलेलं अपग्रेडिंग. आता IRCTC ने त्याचं स्वतःचं पेमेंट गेटवे IRCTC-iPay देखील सुरू केले आहे. आता ही नवी सुविधा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे.

IRCTC-iPay चा कसा होणार फायदा?

IRCTC-iPay अंतर्गत आता आयआरसीटीसी वेबसाइट/मोबाइल अ‍ॅप चा वापर करून तात्काळ रिफंड मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या यूपीआय बॅंक खात्याला किंवा डेबिट कार्डला केवळ एकदाच परवानगी द्यायची आहे. त्यानंतर पुढील व्यवहारांसाठी तेच आपोआप स्वीकारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तिकीट कॅन्सल केल्यानंतरही त्याच रिफंड खात्यामध्ये डेबिट होऊ शकणार आहे.

आयआरसीटीसीच्या या सुविधेअंतर्गत दररोज तिकिटे बुक करणार्‍या लाखो प्रवाशांना बरीच सुविधा मिळेल. तिकीट लवकर बूक होण्यासोबतच रिफंड कंफर्म तिकीट मिळण्याची देखील शक्यता वाढली आहे. पूर्वी तिकिटाचे पैसे रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना 1-2 दिवसांची किमान वाट पहावी लागत होती. भारतीय रेल्वे ने आणला नवा AC 3 Tier Economy Class Coach; पहा जगातला सर्वात स्वस्त, आरामदायी कोच आहे कसा?

IRCTC च्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजन च्या अंतर्गत इंटरफेस अपग्रेड करण्यात आला आहे. आता ही इंटरनेट तिकिटिंग वेबसाईट आशिया पॅसेफिकची सर्वात मोठी ई कॉमर्स वेबसाईट्सपैकी एक झाली आहे. भारतीय रेल्वेच्या रिझर्व्ह तिकिटांमध्ये 83% तिकीटं ही आयारसीटीसीच्या वेबसाईट्सवर बूक होतात. त्यामुळे त्याच्यात सतत बदल केले जात आहेत.