Indian Weather News: कमी बर्फवृष्टीचा पावसावर चांगला परिणाम होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Kedarnath Snowfall

गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात 6 टक्के मान्सून (Monsoon) कमी होता. दरम्यान, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडसह (Uttarakhand) बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. याचा सफरचंद आणि काही पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत महापात्रा यांनी व्यक्त केले. सफरचंद सारख्या काही बागायती पिकांसाठी कमी बर्फवृष्टी ही चिंतेची बाब असल्याचे भारतीय हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे. (हेही वाचा - IMD Weather Alert: देशात पुढील पाच दिवस तापमान आणखी घटन्याची शक्यता- हवामान विभाग)

कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडेल. अशा परिस्थितीत एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने पिकांचे चांगले उत्पादन होईल अशी शक्यता आहे. गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेले नाही. पश्चिम हिमालयीन भागाला याचा फटका बसला आहे. त्याच वेळी, दोन सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागात पाऊस झाला.

गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात मान्सून 6 टक्के कमी होता. जुलै आणि सप्टेंबरमध्ये 13 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर जूनमध्ये पावसात 9 टक्के आणि ऑगस्टमध्ये 36 टक्के घट झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑगस्टमधील पाऊस जूनच्या पातळीप्रमाणे झाला असता तर मान्सून सामान्य होऊ शकला असता.