India's Answer To Canada: खलिस्तानी नेते Hardeep Singh Nijjar यांच्या खूनामध्ये भारत सरकारचा हात असल्याचा कॅनडा सरकारच्या आरोपांचे भारताकडून खंडन
India - Canada | Twitter

कॅनडा (Canada) कडून भारतावर कॅनडा स्थित खलिस्तानी नेते हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar)यांच्या खूनाचा आरोप करण्यात आहे. त्याबाबत कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच, पंतप्रधान Justin Trudeau यांनी त्यांच्या संसदेमध्ये स्टेटमेंट्स जारी केल्यानंतर आता भारताकडून त्याला उत्तर देण्यात आले आहे. 'आम्ही कॅनेडियन पंतप्रधानांनी संसदेमध्ये दिलेल्या विधानांना पाहिलं आहे आणि त्यांना आम्ही फेटाळत आहोत. ' असं म्हटलं आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील कॅनडामधील हिंसाचारामागे भारत सरकारचा हात असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान Justin Trudeau यांनी Hardeep Singh Nijjar यांच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचं म्हणताना या आरोपांची चौकशी असताना आपण भारतीय डिप्लोमॅट्सला जबाबदारीपासून दूर करत आहोत असं म्हटलं आहे.

पहा कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य

भारत सरकारचा प्रतिसाद

खलिस्तान म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वतंत्र शीख मातृभूमीचे खंबीर समर्थक शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांची 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील शीख सांस्कृतिक केंद्राबाहेर गोळीबार केल्यानंतर कॅनडाच्या गुप्तचर संस्था आरोपींचा शोध घेत आहेत.

खलिस्तान चळवळीवर भारतात बंदी आहे, जिथे अधिकारी आणि संबंधित गट राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून पाहतात. परंतु या चळवळीला उत्तर भारतात, तसेच त्यापलीकडे कॅनडा आणि युनायटेड किंगडम सारख्या देशांमध्ये अजूनही काही प्रमाणात पाठिंबा आहे.