पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरला मिळाला 'World Heritage' चा दर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पिंक सिटी (Pink City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरला (Jaipur) युनेस्कोकडून (UNESCO) वर्ल्ड हेरिटेजचा (World Heritage) दर्जा देण्यात आला आहे. येथील प्रत्येक वास्तुकलेवरील शानदार कोरीव नक्षी आणि बांधकाम मनाला मोहून टाकते. तसेच प्राचीन काळापासून लाभलेली राजेशाही संस्कृती आणि पर्यटनासाठी जयपूर जगप्रसिद्ध आहे. जयपूरची मोहकता पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

युनेस्कोने एक ट्वीट केले असून, राजस्थानमधील जयपुर शहराला युनेस्कोच्या 43 व्या बैठकी दरम्यान हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. युनेस्कोची ही बैठक बाकू (अजरबान) येथे पार पडली.

जयपूरला देण्यात आलेल्या हेरिटेज दर्जाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.(Budget 2019 Electric Vehicle: इलेक्ट्रिक कार कमी दरात खरेदी करा, सोबत करसवलत मिळवा; अर्थसंकल्प 2019 मध्ये निर्मला सीतारमण यांच्याकडून ग्राहकांना भेट)

राजस्थान शहराची स्थापना 1728 रोजी आमेरचा महाराजा जयसिंह द्वितीय यांनी केली. या ठिकाणाला सरस-संस्कृती, ऐतिहासिक महत्व आणि राजेशाही थाट या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील राजेशाही महाल पाहण्याजोगे आहे.