India is President of G20: G20 चे अध्यक्षपद आता औपचारीकरित्या भारताकडे, जगभरातून होतयं भारतचं कौतुक
Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

जगभरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या विविध देशांचा समूह म्हणजे G20. याचं G20 चे अध्यक्षपद आता भारताने औपचारिकपणे स्वीकारले आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षभर भारत जी-20चे अध्यक्षपद सांभाळणार आहे. जगाच्या 75 टक्क्यांहून अधिक व्यापार आणि जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व आता भारत करणार आहे. जी-20  या गटात अर्जेंटिना (Argentina), ऑस्ट्रेलिया (Australia), ब्राझील (Brazil), कॅनडा (Canada), चीन (China), फ्रान्स (France), जर्मनी (Germany), भारत (India), इंडोनेशिया (Indonesia), इटली (Italy), जपान (Japan), कोरिया (Republic of Korea), मेक्सिको (Mexico), रशिया (Russia), सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका (South Africa), तुर्की (Turkey), ब्रिटन (Britain), अमेरिका (America) आणि युरोपियन देशांचा समावेश आहे. तरी जगभरातून भारताचं कौतुक होत आहे. तसेच आंतराष्ट्रीय दर्जाच्या दिग्दजांकडून भारताच्या या भक्कम जबाबदारी बाबत विविध प्रतिक्रीया येत आहेत.

 

जी२० म्हणजे नेमक काय?

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिणपूर्व आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांसाठी एक मंच म्हणून G20 ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर  G20 मध्ये राज्य आणि सरकार प्रमुखांचा समावेश करण्यासाठी G20 मध्ये सुधारणा करण्यात आली. 2008 च्या जागतिक आर्थिक संकटादरम्यान G20 च्या समन्वयित प्रयत्नांमुळे दहशत कमी करण्यात आणि आर्थिक वाढ पुनर्संचयित करण्यात मदत झाली. G20 मध्ये युरोपियन युनियनमधील एकूण 19 देशांचा समावेश आहे, जे देश जगाच्या एकूण GDP पैकी 85% GDP देवू करतात.

 

G20 चं अध्यक्षपद किती महत्वाचं?

जगभरातील कुठल्याही देशात G20 चे कायमस्वरूपी सचिवालय नाही. दरवर्षी जी२० गटांतील एक सदस्य अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतो आणि या गटाचा अजेंडा दोन भागात विभागला जातो - एकाचे नेतृत्व अर्थमंत्र्यांचे आणि दुसरे सदस्य देशांच्या नेत्यांचे दूत. 2021-22 या कालावधील हे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे होतं. आता एक वर्षभरासाठी हे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे. भारतानंतर ब्राझील आणि नंतर दक्षिण आफ्रिका हे अध्यक्षपद स्वीकारेल. जी२० चा अध्यक्ष म्हणून भारत सुमारे 50 शहरांमध्ये मंत्री, अधिकारी आणि नागरी समाजाचा समावेश असलेल्या 200 हून अधिक बैठका आयोजित करेल. ज्यात सप्टेंबर 2023 मध्ये राजधानी नवी दिल्ली येथे एक मार्की समिट होईल.