आयआयटी गुवाहाटी (IIT Guwahati) आणि सिंगापूर मेडिकल स्कूलने (Singapore Medical School) डेटा सायन्स मॉडेल (Data-Science Model) आणि लॉजिस्टिकिक दृष्टिकोनातून कोरोना विषाणूचे (Coronavirus) विश्लेषण केले आहे. त्यानुसार पुढील 30 दिवसांत कोविड-19 ची दीड ते साडेपाच लाख प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. डेटा सायन्स मॉडेलवरून केलेल्या विश्लेषणानुसार कोरोना इन्फेक्शनचा आकडा 1.30 लाखांपर्यंत पोहोचेल, तर लॉजिस्टिक पद्धतीने देशात संसर्गाची 5.50 प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. आयआयटी गुवाहाटी आणि सिंगापूर येथील ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी कोविड-19 पासून संक्रमित लोकांच्या संख्येचे मूल्यांकन आणि विश्लेषणासाठी, वैकल्पिक मॉडेल्स अवलंबिले आहेत.
या टीमने विकसित केलेले डेटा सायन्स मॉडेल तीन वेगवेगळ्या मॉडेल्सचे संयोजन आहे व सध्या देशात याचा वापर होत आहे. आयआयटी गुवाहाटीचे सहाय्यक प्राध्यापक पलाश घोष यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही एका मॉडेलवर आधारित अहवाल आपली दिशाभूल करू शकतो. त्यामुळे ही शक्यता दूर करण्यासाठी घातांक, लॉजिस्टिक आणि ससेप्टीबल इन्फेक्शीयस ससेप्टीबल मॉडेल्सचा विचार केला आहे. या मॉडेलमध्ये राज्यांना मध्यम, गंभीर आणि नियंत्रित अशा तीन प्रकारात विभागले गेले आहे. हे ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोनच्या वर्गीकरणापेक्षा वेगळे आहे. (हेही वाचा: COVID 19 महामारीच्या लढ्यात अमेरिकेची भारताला 3.6 मिलियन डॉलर ची मदत)
मॉडेलमध्ये लॉजिस्टिक पद्धती आणि घातांकीय पद्धती (गंभीर परिस्थितीच्या घटनेचा अंदाज) द्वारे प्रकरणांचे मूल्यांकन केले जाते. हा अहवाल प्रत्येक राज्याच्या दैनंदिन संक्रमण-दर (डीआयआर) मूल्यांसह अलिकडच्या काळात सक्रिय प्रकरणांच्या वाढीवर आधारित आहे. अशाप्रकारे भारतासाठी पुढील 30 दिवस महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 3604 नवे कोविड-19 आढळले असून एकूण संख्या 70,756 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.