COVID 19 महामारीच्या लढ्यात अमेरिकेची भारताला 3.6 मिलियन डॉलर ची मदत
Prime Minister Narendra Modi with US President Donald Trump | (Photo Credits: IANS | File)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात भारतात दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत परिणामी देशातील परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. साहजिकच या सर्व परिस्थितीने आर्थिक बाजूवर सुद्धा बारच तणाव येत आहे. अशावेळी भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने (US)  हात पुढे केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या माहितीनुसार,US Centers for Disease Control and Prevention (CDC) ने कोरोना विरूद्ध भारत सरकारच्या लढाईसाठी 3.6 दशलक्ष डॉलर्स देण्याचे वाचन दिले आहे. हा निधी भारतात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दिला जाणार आहे. सध्या देशात असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हा निधी मदत म्हणून सिद्ध होईल अशी अपेक्षा सुद्धा अमेरिकन दूतावासाने बोलून दाखवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरोना टेस्ट घेण्यासाठी अधिकाधिक सक्षम प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात यासाठी ही मदत देण्यात येत आहे. मोलेक्युलर पद्धतीने रोगाचे निदान आणि serology सारखे तंत्रज्ञान निर्माण करण्यात हा निधी मदत करेल, असे अमेरिकेच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. Coronavirus Outbreak: जगभरात एकूण 40 लाख कोरोना बाधित तर 2 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू

ANI ट्विट

कोरोना पसरत असताना लोकांच्या चाचण्या करून अर्थमिक स्तरावर असतानाच उपचार करणे आवश्यक आहे, त्यासाठी अगदी छोट्या छोट्या भागात सुद्धा हॉस्पिटलचे जाळे निर्माण करायला हवे. भारतात सामान्य जनतेला सुद्धा स्वच्छता आणि आरोग्य कार्यात जोडून घेण्यासाठी सीडीसी तर्फे स्थानिक पातळीवर गट बनवले जाणार आहेत. केवळ कोरोनाचा नव्हे तर या पुढे भविष्यातही असे कोणतेही आरोग्यविषयक संकट उद्भवल्यास त्यास लढा देण्यासाठी हा मोठा वर्ग तयार असेल अशी आशा सीडीसी ने व्यक्त केली आहे. 'वन्दे भारत' अभियानाअंतर्गत अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या 7 फ्लाईट्सची घोषणा; येथे पहा 11-15 मे दरम्यान होणाऱ्या उड्डाणांची यादी

दरम्यान, अमेरिकेत सुद्धा कोरोनाने अक्षरशः हाहाकार घातला आहे. आतापर्यंत अमेरिकेत जवळपास 14 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 81 हजार हुन अधिकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेला या संकटकाळात मदत करत भारताने काही दिवसांपूर्वी हायड्रॉक्सिक्लोरीनचा पुरवठा केला होता. तर आता भारताला संकटकाळात आर्थिक मदत करून अमेरिकेने एका प्रकारे आभार मानले आहेत.