जर तुमचे एका पेक्षा अधिक बँकेत खाते असल्यास आणि त्याचा उपयोग तुम्ही करत नसल्यास तर ते बंद करणे या योग्य पर्याय आहे. कारण बँकेत खाते उघडण्यासाठी नियमांनुसार त्यामध्ये कमीतकमी रक्कम असणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुम्ही खात्यात रक्कम न ठेवल्यास बँक तुमच्याकडून बॅलेन्स मेन्टेन न केल्याचा दंड स्विकारते. तज्ञांच्या मते, जर तुम्ही एखादे बँक खाते बंद करत असल्यास त्या संबंधित अधिक कागपत्रे डी-लिंक करणे आवश्यक आहे. कारण बँके खात्यात गुंतवणूक, लोन. ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि विमा संबंधित कागदपत्रे बँक खात्याला लिंक केलेली असतात.
त्यामुळे एका बँकेत खाते असूनही अन्य शाखांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. तर जाणून घ्या तुम्ही कशा पद्धतीने तुमचे दुसऱ्या शाखेतील बँक खाते बंद करु शकता.
>>सध्याच्या काळात लोक त्यांच्या नोकऱ्या बदलत असतात. मात्र ज्या कंपनीत नोकरी करतात त्या ठिकाणी सॅलरी अकाउंट सुरु केले जाते. परंतु तुम्ही एखादी कंपनी सोडून गेल्यास पूर्वीचे अकाउंट निष्क्रीय होते. कोणत्याही सॅलरी अकाउंट मध्ये तीन महिन्यापर्यंत सॅलरी न आल्यास ते आपोआप बचत खात्यात रुपांतर होते.
>>बचत खात्यात रुपांतर झाल्यास त्या संबंधित काही नियम सुद्धा बदलले जातात. त्यानुसार ग्राहकाला खात्यात कमीतकमी रक्कम ठेवणे अनिवार्य असते. असे न केल्यास बँकेकडून दंड स्विकारला जातो.
>>एका पेक्षा अधिक बँक खात्यात पैसे असल्यास इन्कम टॅक्स भरण्यावेळी काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावेळी तुमच्या प्रत्येक बँक खात्यासंबंधित अधिक माहिती द्यावी लागते.
(LIC येत्या 30 नोव्हेंबरपासून अनेक विमा पॉलिसी प्लान करणार रद्द ; पाहा काय आहे कारण?)
तर खाते बँद करताना बँकेकडून डी-लिंक नावाचा फॉर्म दिला जातो. तो फॉर्म बँकेला देण्यापूर्वी तुम्ही खाते का बंद करत आहात त्याची माहिती द्यावी लागते. तसेच बँक खात्यामधील रक्कम कोणत्या दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणार आहात हे सुद्धा बँकेला सांगावे लागते. मात्र ही सर्व खटपट करण्यासाठी बँक खाते धारकाला बँकेत जाऊनच करावी लागते.