ICMR Guidelines For Fever: सौम्य तापामध्ये Antibiotics घेणं टाळा; आयसीएमआर ची जाणून घ्या नवी नियमावली
Representational Image (Photo Credit: Pixabay

ICMR कडून नागरिकांना करण्यात आलेल्या आवाहनानुसार, सौम्य तापासाठी, Viral Bronchitis अ‍ॅन्टीबायोटिक्सचा (Antibiotics)  वापर टाळावा. डॉक्टरांना देखील अशाप्रकारचा सल्ला देताना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. ICMR Guidelines च्या नुसार, अ‍ॅन्टिबायोटिक्स ही Skin and Soft Tissue Infections मध्ये 5 दिवसांसाठी द्यावीत. Community Acquired Pneumonia मध्येही 5 दिवस आणि Hospital Acquired Pneumonia मध्ये 8 दिवस द्यावीत.

Clinical Diagnosis बहुतेकदा आम्हाला क्लिनिकल सिंड्रोममध्ये फिट होणा-या Correct Antibiotic चा अंदाज लावण्यास मदत करते. जे संसर्गाचे निदान करण्यासाठी ताप, प्रोकॅलसीटोनिन पातळी, WBC संख्या, रेडिओलॉजीवर आंधळेपणाने अवलंबून राहण्यापासून आम्हांला लांब ठेवते असे," मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

गंभीर आजारी रुग्णांसाठी Empiric Antibiotic Therapy मर्यादित ठेवण्याच्याही सूचना आहेत. Empiric Antibiotic Therapy ही प्रामुख्याने Severe Sepsis आणि Septic Shock, Community-Acquired Pneumonia, Ventilator-Associated Pneumonia आणि Necrotizing Fasciitis ने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या निवडक गटासाठी दिली जाते. त्यामुळे याचा वापर हुशारीने आणि लक्ष्य ठेवून करावा. नक्की वाचा: सर्पदंश संशोधनासाठी राज्यात ICMR केंद्र उभारण्याची Amol Kolhe यांची Union Ministry of Health कडे पत्राद्वारे मागणी .

.1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान केलेल्या ICMR सर्वेक्षणात असे सुचवण्यात आले होते की carbapenem या पॉवरफूल अ‍ॅन्टिबायोटिक्सचा वापर भारतात अनेक रूग्णांवर प्रभावीपणे झालेला नाही. carbapenem ही आयसीयू मध्ये असलेल्या pneumonia and septicemia ग्रस्त रूग्णांवर केला जातो. कारण त्यांच्यामध्ये Anti-Microbial Resistance वाढलेला असतो.

अनेक Drug-Resistant ही Pathogens मध्ये वाढ करत आहेत. ज्यामुळे सध्या मार्केट मध्ये असल अनेक औषधं ही उपचार करणं अधिक किचकट करत आहेत अशी माहिती डाटा मधून समोर आली आहेत.