देशात लवकरच कोविड-19 (Covid-19) लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल. केंद्र आणि राज्य सरकारने याची तयारी सुरु केली आहे. ड्राय रनची (Dry Run) प्रक्रीया देखील सुरु आहे. अशातच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी कोरोना लसीबद्दल उलटसुलट चर्चा रंगत आहेत किंवा अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारने व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) मदतीने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजना तयार केली आहे. यासाठी Chatbot लॉन्च करण्यात येणार असून लसीसंदर्भात सर्व प्रश्न, शंका यांची उत्तरे व्हॉट्सअॅप द्वारे दिली जाणार आहेत. व्हॉट्सअॅप द्वारे तुम्ही तुमच्या जवळील लसीकरण केंद्र, लसी घेतल्यानंतरचा आहार यांसारखी माहिती मिळवू शकता.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉन्चपूर्वी आम्ही संभाव्य प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत. ही योजना पायलट स्टेजमध्ये असून याचा उपयोग लसीकरणासंबंधित विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केला जाणार आहे. सरकारचे हे व्हॉट्सअॅप चॅटबॉट लोकांना कोरोना व्हायरस संबंधित माहिती देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. (कोविड-19 ची लस मिळाल्यानंतर कोरोनामुक्त झालो म्हणून गाफील राहू नका- आरोग्यमंत्री राजेश टोपे)
कोविड-19 लसी संदर्भात असलेले प्रश्न लोक +91-9013151515 नंबरवर पाठवू शकतात. विशेष म्हणजे प्रश्न पाठवण्यासाठी भाषेचे कोणतेही बंधन नाही. यावर तुम्ही हिंदी पाठवलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे देण्यात येतील. (COVID-19 Vaccination in India: केवळ आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांनाच मिळणार मोफत लस; डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण)
सीरम इंस्टिट्यूट च्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आल्याची घोषणा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रविवारी केली. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेकने विकसित केली असून पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटची कोविशिल्ड लस अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे.
दरम्यान, यापूर्वी कोरोना लसीमुळे नपुंसक होण्याची भीती पसरवली जात होती. तसंच Penis ची लांबी 3 इंचाने वाढते, असे देखील सांगितले जात होते. मात्र अफवांचे खंडन करण्यात आले आहे.