खरंच पेनिसमुळे लिंगाच आकार वाढतो? (Photo Credits: Twitter & File Image)

Can COVID-19 Vaccine increase your penis length? खरंच कोरोना व्हायरसची लस घेतल्याने पेनिसचा आकार वाढतो? या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून सोशल मीडियात ही गोष्ट तुफान व्हायरल झाली आहे. याच दरम्यान सोशल मीडियातील एका युजर्सने एका दाव्यासह पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये कोरोनावरील लसीमुळे पेनिसचा आकार वाढण्यास मदत होत असल्याचा दावा केला आहे. ट्विटर आणि फेसबुकवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले की, पेनिसचा आकार 3 इंचापर्यंत वाढण्यास मदत होती. त्यामुळे ज्यांच्या पेनिसचा आकार लहान आहे त्यांनी कोरोनावरील लस घेतल्यास त्याचा आकार वाढला जाईल.

तर पाहूयात अशी पोस्ट ज्यामध्ये कोरोनावरील लसीमुळे लिंगाचा आकार 3 इंचा पर्यंत वाढू शकतो असा उल्लेख करण्यात आला आहे.(Covaxin आणि Covishield लसीला मंजूरी मिळाल्यानंतर सोशल मीडियात फनी मीम्स आणि जोक्सना उधाण)

कोरोनाच्या लसीमुळे पेनिसचा आकार वाढत असल्याच्या पोस्टचा एक स्क्रिशॉट व्हायरल केला गेला आहे. त्यानुसार ते मेडिकल जर्नल असल्याचे भासते. स्क्रिशॉट नीट पाहिल्यास असे दिसते की, पेपर 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मर्डेसिन' (The New Ingaland Journal of Merdecine) असल्याचे कळेल. ज्यामध्ये शब्दांच्या खुपच चुका असून त्या संपूर्ण पेपर मध्ये ही दिसून येतील. परंतु पोस्ट लोकांना कोरोनाची लस घेण्यास प्रोत्साहित करत असल्याचे ही दिसून येते.

त्यामुळे जर तुम्ही द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मर्डेसिन असे शोधाल तर तुम्हाचा हाती काहीच येणार नाही कारण प्रसिद्ध न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसन (The New England Journal Of Medicine) असे सत्य असून व्हायरल करण्यात आलेली पोस्ट खोटी आहे. तर न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसन यांच्याकडून लिंगाच्या आकारात अशा पद्धतीची कोणतीच माहिती दिलेली नाही आणि द न्यू इंग्लंड जर्नल मर्डेसिन हे खोटे आहे.