Covaxin आणि Covishield लसीला मंजूरी मिळाल्यानंतर सोशल मीडियात फनी मीम्स आणि जोक्सना उधाण
Covid-19 Vaccine Memes (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत आज भारत एका निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. आज सीरम इंस्टिट्युडच्या (Serum Institute of India) कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) लसीला DCGI कडून आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही बातमी अत्यंत दिसालादायक असून याचा आनंद संपूर्ण भारतभर व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या निर्णयावरुन फनी मीम्स आणि जोक्स (Funny Memes & Jokes) देखील उधाण आले आहे. जोक्स आणि मीम्स च्या माध्यमातून नेटकरी हा आनंदी क्षण सेलिब्रेट करत आहेत. प्रत्येक घटना, गोष्ट यावर मीम्स व्हायरल होण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे ही अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक घटना देखील मीम्सच्या कचाट्यातून सुटली नाही.

कोविड-19 च्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित असल्याचे डीसीजीआयचे डॉ. व्ही.जी. सोमानी यांनी सांगितले आहे. दरम्यान, काल कोरोना लसीच्या ड्राय रन्स भारतभर पार पडल्या. त्यानंतर आज लसीला मंजूरीही मिळाली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे. याचा आनंद मीम्सच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. (COVID-19 Vaccine: भारतामध्ये Covishield, COVAXIN ला Emergency Use साठी DCGI ची मंजुरी)

पहा व्हायरल मीम्स आणि जोक्स:

कोविड-19 लसीला मंजूरी मिळाल्यानंतर व्हायरल होणारे हे मीम्स पाहुन तुम्ही देखील नक्कीच हसला असला. दरम्यान, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्या कष्टाचे हे फळ असून सर्वांचे अभिनंदन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निर्णयानंतर केले होते.