Covaxin, Covishield Vaccines 110% सुरक्षित; कोविड 19 लसी लोकांना नापुंसक बनवत असल्याच्या दाव्याला DCGI Dr VG Somani यांनी फेटाळलं (Watch Video)
DCGI Dr VG Somani (Photo Credits: ANI)

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. सोमाणी (VG Somani) यांनी आज ( 3 जानेवारी) भारतामध्ये मंजूर करण्यात आलेल्या कोविड 19 लसीला 110% सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. जर सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही एखादा धोका असला असता तर आम्ही तो स्वीकरला नसता. यासोबतच त्यांनी इतर लसीप्रमाणे या लसीचे काही सौम्य दुष्परिणाम असू शकतात असे म्हटले आहे. यामध्ये अंगदुखी, हलका ताप, अ‍ॅलर्जी असल्याचं म्हटलं आहे. पण कोविड 19 लसी लोकांना नापुसंक (Impotent)करत असल्याची बाब धुडकावून लावली आहे.

दरम्यान आज भारतामध्ये Serum Institute of India आणि Bharat Biotech च्या कोविड 19 लसी Covaxin व Covishield ला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान काहींनी कोविड 19 लसी लोकांना नापुंसक करत असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या त्या Rubbish असल्याचं सांगत धुडकावलं आहे. Mirzapur SP MLC Ashutosh Sinha यांनी अशाप्रकरचं वक्तव्य केले होते. COVID-19 Vaccine: भारतामध्ये Covishield, COVAXIN ला Emergency Use साठी DCGI ची मंजुरी.

DCGI Dr VG Somani यांची प्रतिक्रिया

भारतामध्ये आज आपत्कालीन वापरासाठी मंजुर झालेल्या दोन्ही कोविड 19 लसी या स्वदेशी आहेत. सोबतच तिसरी लस कॅडीला हेअल्थकेअर कंपनीला तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. फायझर या अमेरिकन कंपनीची लस देखील आपत्कालीन मंजुरीसाठी भारतात डीसीजीआय कडे अर्जदारांच्या यादीमध्ये होती मात्र त्यावर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणं टाळण्यात आले आहे.