Gautam Adani यांचे ग्रह फिरले; अदानी समूहाच्या तीन कंपन्या ASM यादीत, S&P Dow Jones कडूनही समभाग वगळण्याची घोषणा
Gautam Adani | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेच्या भारतीय शेअर बाजारात वादळ आले. ज्यामुळे अदानी एंटरप्रायझेससह (Adani Enterprises) अदानी समूहाच्या तब्बल तीन कंपन्या एक्सचेंजच्या नजरकैदेत आल्या आहेत. त्यामुळे या सर्व कंपन्यांवर आता बीएसई (BSE) आणि एनएसईच्या (NSE) अल्पकालीन अतिरिक्त पाळत ठेवली जाईल. ज्याला एएसएम (ASM) फ्रेमवर्क म्हटले जाते. हे कमी की काय म्हणून आता अदानीसमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आता डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सेसमधून काढून टाकले जात आहेत. S&P Dow Jones Indices ने याबाबत नुतीच घोषणा केली.

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेच्या अहवालाने गौतम अदानी आणि अदानी समूहाला (Adani Group Companies) मुळापासून हादरवून टाकले आहे. हा धक्का इतका जबरदस्त आहे की, अदानी यांचे स्टार फिरल्याची आर्थिक वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Hindenburg Impact On Adani Group: हिंडनबर्ग रिपोर्टचा झटका, अदानी समूह धक्क्याला; एका दिवसात 100 अब्ज डॉलरचे नुकसान)

ASM मध्ये असलेल्या अदानी समूहाच्या कंपन्या

  • अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises)
  • अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports and Special Economic Zone)
  • अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements)

स्टॉक एक्स्चेंज NSE, BSE ने अतिरिक्त पाळत ठेवणे उपाय (ASM) फ्रेमवर्क अंतर्गत अदनी यांच्या तीन कंपन्यांवर 3 फेब्रुवारीपासून अंकूश लावला आहे. एक्स्चेंजने अल्प-मुदतीच्या आधारावर अनेक स्टॉक्स शॉर्टलिस्ट केले आहेत. याचा अर्थ असा की इंट्राडे ट्रेडिंगसाठी देखील 100% अपफ्रंट मार्जिन आवश्यक असेल आणि सट्टेबाजी अथवा इतर करफुगवेगीरीला आळा बसेल.

कोणत्याही कंपनीचे समभाग ASM मध्ये ठेवण्यासाठी सिक्युरिटीजची शॉर्टलिस्टिंग SEBI आणि एक्सचेंजेसने संयुक्तपणे काही निकष ठरवे आहेत. ज्यामध्येय समभागांच्या किमतीची उच्च-कमी भिन्नता, क्लायंट एकाग्रता, क्लोज-टू-क्लोज किंमत भिन्नता, बाजार भांडवल, व्हॉल्यूम भिन्नता, वितरण टक्केवारी, अद्वितीय पॅनची संख्या आणि इक्विटी किंमत यासारख्या बाबींचा समावेश आहे.

ASM मध्ये ठेवण्यासाठी सिक्युरिटीजची शॉर्टलिस्टिंग SEBI आणि एक्सचेंजेसने संयुक्तपणे ठरवलेल्या वस्तुनिष्ठ निकषावर आधारित आहे. यामध्ये उच्च-कमी भिन्नता (High-low Variation), क्लायंट एकाग्रता (Client Concentratio), क्लोज-टू-क्लोज किंमत भिन्नता (Close-to-Close Price Variation, बाजार भांडवल (Market Capitalization), व्हॉल्यूम भिन्नता (Volume Variation), वितरण टक्केवारी (Delivery Percentage), अद्वितीय पॅनची संख्या (Number of Unique PANs) आणि इक्विटी किंमत (Price to Equity) यासारख्या बाबींचा समावेश आहे. ASM फ्रेमवर्कचा उद्देश गुंतवणूकदारांना या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करताना अधिक सावध राहण्याचा सल्ला देणे हा असतो.