Police during lockdown (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांसह मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तर लॉकडाउनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. मात्र रस्त्यावर विनाकारण फिरण्यासाठी नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तर देशातील सध्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला तर त्यामध्ये नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून लॉकडाउनचे आदेश वाढवण्यासंबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कोरोना व्हायरसच्या काळात सोशल मीडियात विविध माहिती पुरवली जात आहे. तसेच काही समाजकंटकांकडून कोरोनाच्या संबंधित अफवा आणि चुकीच्या माहिती व्हायरल केल्या जात आहे. अशा लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. परंतु लॉकडाउनचे आदेश मोदी सरकारने येत्या 14 एप्रिल पर्यंत लागू असणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन अधिक काही दिवस वाढवणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन 14 तारेखनंतर वाढवणार का यावर अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. (Coronavirus संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी तरुणाचा हटके प्रयत्न; कोरोनाच्या डिझाईनचे हेल्मेट घालून लोकांना दिला घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला)

दरम्यान, मागील 12 तासात देशात 355 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज देशातील विविध राज्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2547 इतकी होती. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, आज देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. या आकडेवारीनुसार देशात 2650 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.