कोरोना व्हायरसचा भारत देशात वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरातून होत आहे. नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस संबंधित जागरुकता निर्माण करण्यासाठी नेते मंडळींसह सेलिब्रेटी, क्रीडापटू विविध माध्यमातून आवाहन करत आहेत. यातच एका तरुणाने कोरोनाची जनजागृती हटके पद्धतीने केली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) येथे एका समाजसेवकाने कोरोना व्हायरसच्या डिझाईनचे हेल्मेट (Corona Themed Helmet) परिधान करत जनजागृती केली. विशाल पाल असे या तरुणाचे नाव आहे. कोरोना व्हायरसच्या डिझाईनचे हेल्मेट घालून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना 'घरी रहा सुरक्षित रहा' असा सल्ला त्याने दिला. लॉकडाऊनचा निर्णय हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना सुरक्षिततेसाठी घरीच रहा असे आवाहन त्याने केले आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. हाच धोका लक्षात घेत नागरिकांना सोशल डिस्टसिंग (Social Distancing) पाळण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे देखील गरजेचे आहे.
ANI Tweet:
Moradabad: Vishesh Pal, a social worker, wears a #coronavirus-themed helmet & appeals to people who are out on the streets to stay at home, during the lockdown imposed to prevent spread of the disease. He says, "I appeal to people to stay at home to ensure safety of everyone". pic.twitter.com/vxGcqT45Cp
— ANI UP (@ANINewsUP) April 4, 2020
यापूर्वी चैन्नईच्या एका आर्टिस्टने कोरोना व्हायरसच्या डिझाईनचे हेल्मेट बनवले होते. ते घालून पोलिस लोकांना जागरुक करत होते. तर आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसप्रमाणे रंगवलेल्या घोड्यांवर बसून पोलिसांनी नागरिकांना सतर्क केले. ओडिसा येथे पोलिसांनी सायकल रॅली काढून नागरिकांना घरी सुरक्षित राहण्याच सल्ला दिला.