संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. मात्र, तरीदेखील लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना अशा नागरिकांवर लाठी चार्ज करावा लागत आहे. परंतु, चेन्नईमधील पोलिसांनी चक्क कोरोनासारखं हेल्मट (Coronavirus Helmet) घालून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
कोरोना सारख्या दिसणाऱ्या या हेल्मेटची रचना तामिळनाडूतील स्थानिक कलाकार गौथम यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या हेल्मटचे फोटो व्हायरल होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना देत आहेत. परंतु, नागरिक सरकारच्या या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना कडक कारवाई करत लाठी चार्ज करावा लागत आहे. (हेही वाचा - 'जिंदगी मौत ना बन जाए' गाणं गात पोलिस कॉन्स्टेबल ने नागरिकांना केलं घराबाहेर न पडण्याचं आवाहन; पहा व्हिडिओ)
Tamil Nadu: Police in Chennai has been creating awareness among the people about the importance of them staying at home amid #CoronavirusLockdown by making a police personnel wear a helmet designed to look like Coronavirus. The helmet has been designed by a local artist Gowtham. pic.twitter.com/LlxrUYfihX
— ANI (@ANI) March 28, 2020
दरम्यान, शुक्रवारी सोशल मीडियावर एका पोलिस कॉन्स्टेबलने 'सरफरोश' चित्रपटातील 'जिंदगी मौत ना बन जाए' हे गाणं गात लोकांना घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पोलिसाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या पोलिसाने लोक गाण्याच्या माध्यमातून तरी जागरूक होतील, या भावनेने गीत गात नागरिकांना घराबाहेर न पडण्यास सांगितलं होतं.
लॉकडाऊन काळात पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी घरातचं थांबावं, अशा सुचना सरकारकडून वारंवार दिल्या जात आहेत. नागरिकांनी या सुचनांचे पालन करणं आवश्यक आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 150 हून अधिक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.