'जिंदगी मौत ना बन जाए' गाणं गात पोलिस कॉन्स्टेबल ने नागरिकांना केलं घराबाहेर न पडण्याचं आवाहन; पहा व्हिडिओ
पोलिसांनी गायलं गाण (PC - Twitter)

सध्या देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, तरीदेखील लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने नागरिकांवर लाठी चार्ज करावा लागत आहे. लाठी चार्च करूनही नागरिक ऐकत नसल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलने (Police Constable) 'सरफरोश' चित्रपटातील 'जिंदगी मौत ना बन जाए' हे गाणं गात लोकांना घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पोलिसाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोलिसाने लोक गाण्याच्या माध्यमातून तरी जागरूक होतील, या आशेने गीत गायले असून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. (हेही वाचा - Lockdown In India: राज्यात अंडी, कोंबडी, मटण, फळ विक्रीवर कोणतेही बंधन नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार)

दरम्यान, अनेक दिग्गज नेते तसेच कलाकारांकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिक या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना कठोर निर्णय घेत त्यांच्यावर लाठी चार्ज करावा लागत आहे. अनिल देशमुख यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दित पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.