Election of President of India: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया,  मतदान पद्धती आणि निवड
Rashtrapati Bhavan | (Photo Credit: Rashtrapatisachivalaya)

भारताचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपती (President of India) हे खरे तर रबरी स्टॅम्प म्हणून ओळखले जातात. घटनात्मक प्रमुख म्हणून भारतातले हे सर्वोच्च पद असले तरी प्रत्यक्षात अधिकार मात्र पंतप्रधानांकडे असतात. असे असले तरी या पदावर (Selection of President of India) जाणाऱ्या व्यक्तीबातब देशभरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. राष्ट्रपती पदावरील व्यक्तीची निवड कशी केली जाते. त्यासाठी कोण मतदान (Presidential Election Voting) करते? किती आणि कोणते लोक यासाठी मतदान करतात, त्याची प्रक्रिया ( Presidential Election Procedures) कशी असते असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होता. जाणून घेऊया भारताच्या राष्ट्रपत पदाची निवडणूक ( Election of President of India) प्रक्रिया.

भारताच्या राष्ट्रपतीची निवड ही देशभरातील इलेक्ट्रॉरल कालेजच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मतदानाद्वारे होते. आजघडीला देशातील इलेक्ट्रॉरल कालेजच्या एकूण सदस्यांचे कूल वोट मूल्य 10,98,903 इतके आहे. बदलत्या सदस्यसंख्येमुळे ही प्रमाण आणखी वाढू शकते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशातील विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभेतील सदस्य मतदान करतात. अपवाद केवळ राज्यात राज्यालप नियुक्त आणि संसदेतील (राज्यसभा) राष्ट्रपती नियुक्त सदस्य या पदासाठी मतदान करु शकत नाहीत.

Rashtrapati Bhavan | (Photo Credit: Rashtrapatisachivalaya)

राष्ट्रपती निवडणूक मतदान पद्धती

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती अवलंबली जाते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदानासाठी व्हीप बजावता येत नाही. म्हणजेच कोणताही मतदार त्याच्या पसंतीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करु शकतो. मतदानाची प्रक्रियाही विशिष्ट पदधतीची असते. जी इतर निवडणुकीपेक्षा काहीशी वेगळी ठरते.

राष्ट्रपती निवडणूक मतदान प्रक्रिया

प्रत्येक मताचे वेगळे मूल्य असते. हे मूल्यही विशिष्ट पद्धतीने ठरते.

राज्याची एकूण लोकसंख्या म्हणजेच राज्यातील एकूण आमदारांची संख्या त्याला 1000 ने भागले जाते. ही लोकसंख्येची आकेडवारी 1971च्या सेन्सस मधून घेतली जाते. आजघडीला देशातील राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशातील आमदारांच्या मतांचे मूल्य राष्ट्रपती निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 208 इतके आहे. तर गोव्यातील आमदाराचे मतमूल्य सर्वात कमी म्हणजेच 8 इतके आहे. खासदारांच्या मतांचे मूल्यही अशाच पद्धतीने ठरते. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाले तेव्हा प्रत्येक खासदाराचे मतमूल्य हे 708 इतके होते.

Rashtrapati Bhavan | (Photo Credit: Rashtrapatisachivalaya)

कसे होते मतदान?

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी मतदाराला उमेदवारांचा प्राधान्य क्रम ठरवावा लागतो. हे मतदान बॅलेट पेपरवर पार पडते. प्रत्येक मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराला प्राधान्याचे मत देतो. ज्या उमेदवाराला सर्वाधिक प्राधान्यक्रमाची मते मिळतात तो राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. पहिल्या उमेदवाराला तर अग्रक्रमाची मतं मिळाली नाहीत तर तो फेरीतून बाद होतो. पुढच्या उमेदवारासाठी अग्रक्रमांकाची मते मोजली जातात. असे करत करत ज्या उमेदवराला अग्रक्रमांकाची मते मिळतात त्याची निवड होते.