Coronavirus: Lockdown काळात अर्थव्यवस्था 200 bps ने घसरु शकते, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे कोरोना व्हायरस संकटावर भाष्य
File image of former finance minister Yashwant Sinha | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस ( Coronavirus) जगावर एक संकट बणून आले आहे. जगभरातील अनेक देशांना त्याचा फटका बसणार आहे. उत्सुकता इतकीच की कोणत्या देशाला या संकटाचा किती फटका बसतो. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा (Ex-Finance Minister Yashwant Sinha) यांनी या संकटामुळे अर्थव्यवस्थेला किती फटका बसू शकतो याबाबत भाष्य केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, सिन्हा यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि लॉकडाउन या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात (2020-21) 2 परसेंटेज पॉइट्नसनी घसरु शकते. भारतात या आधिच बेकारीचा दर मोठ्या प्रमाणावर उंचावला होता. कोरोना व्हायरसमुळे घ्याव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा देशाला आता अधिक फटका बसेल.

यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले की, 'माझा निष्कर्ष असा की, देशात करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे विकास दर (जीडीपी) सुमारे 1 टक्क्यांनी घसरेल. कोरोना व्हायरस देशात येण्यापूर्वीची स्थिती जर याला जोडली तर आर्थिक वर्ष 2020-21' मध्ये 2 टक्क्यांची घट पाहायला मिळू शकते.'

यशवंतर सिन्हा हे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री राहिले आहेत. भाजप आणि एनडीएचे ते एक महत्त्वाचे नेते होते. दरम्यान, अलिकडील काळात यशवंत सिन्हा हे मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कार्यकाळाचे मोठे टीकाकार राहिले आहेत. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था आगोदरच 7-8 तिमाहिंमध्ये घसरत चालली आहे. ही घसरण कोरना व्हायरस महामारी येण्यापूर्वीपासूनच सुरु होती. जर आम्ही योग्य पद्धतीने गरीबी निवारण करण्याचे लक्ष्य ठेवतो. तर, ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कमीत कमी विकासदर 8% इतका राहायला हवा. सध्या तो 5% इतका आहे.

कोरोना व्हायस संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज नुकतेच जाहीर केले आहे. या पॅकेजबाबत बोलताना यशवंत सिन्हा यांनी सांगितले की, या संकटाचा सामना करताना होणारा खर्च 1 लाख 70 हजार आहे. याचा अर्थ असा की, सरकारची आर्थिक तूट सुमारे 1 परसेंट पॉइंट 100 bps) इतका राहिली. ज्याचा सरकारच्या खर्चावर परिणाम होईल. सरकारकडे गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत कमी निधी राहील. त्यामुळे देशाची स्थिती प्रचंड वाईट होईल. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी काही नव्या गोष्टी करणयाची आवश्यकता आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार, महागाई, उद्योग आणि अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम)

यशवंत सिन्हा यांनी पुढे सांगितले की, 'सरकारने दररोद कमाई करणाऱ्या किंवा हातावर पोट असलेल्या नागरिकांची ओळख दिली नाही. ज्याच्या पास ओळखपत्र नसते. खास करुन छोटी शहरं आणि गावात राहणाऱ्या लोकांकडे, कामगारांकडे अशी ओळखपत्र असत नाहीत. त्यामळे अशा लोकांकडे सरकारचा पैका कसा पोहोचने याबाबत मोठी उत्सुकता आहे. अशा स्थितीत 2030 किंवा 2032 या काळापर्यंत आपण 5 ट्रिलियन डॉलर इतकी मोठी अर्थव्यवस्था बनवू शकत नाही,' असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.