विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) हा महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात शुष्क प्रदेश (Dry Region) म्हणून ओळखला जातो, यंदा देखील पर्जन्याचे प्रमाण कमी होण्याच्या अंदाजातून या प्रदेशात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे असे स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेने सांगितले आहे. याबरोबरच मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्रभर यंदा सरासरीच्या तुलनेत कमी किंवा अपुरा पाऊस पडणार असून यामुळे पाणी टंचाईला (Water Shortage)सामोरे जावे लागेल असाही अंदाज स्कायमेट ने वर्तवला आहे.
प्रशांत महासागरात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने झालेल्या एल निनो परिस्थिती मुळे दक्षिण पश्चिम मान्सून वाऱ्यांनी पडणारा पाऊस यावर्षी कमी होईल अशी माहिती स्कायमेटने मंगळवारी दिली होती मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ या भागांना बसू शकतो असे हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार समोर येत आहे.
भारतातील मध्य व पश्चिमेकडील राज्यांमध्ये सरासरी कमी पाऊस होईल अशी चिन्हे दिसतायत, ज्यामध्ये विदर्भ व मराठवाडा या विभागात अपक्षेपेक्षा 9% कमी पाऊस पडेल त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची पूर्ण शक्यता आहे, त्यासाठी या विभागातील रहिवाश्यांनी व प्रशासनाने तळावरील व जमीनीखालील पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास करून योग्य ते उपाय करण्याची तयारी सुरु करावी असा इशारा, स्कायमेटचे व्यवस्थपकीय संचालक जातीं सिंग यांनी दिला आहे.
मुंबईला देखील या प्रकारचा यंदा मोठा धक्का बसणार आहे, मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलाव व धरणांमधील पाणी साठा दिवसेंदिवस घाट चालल्याने पाणी कपात व पाणी टंचाईची शक्यता आहे असे बीएमसी तर्फे नागरिकांना सांगण्यात आले होते. यंदा मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा,तलाव आटल्याने पाणी टंचाईची शक्यता - 'SKYMET' Weather
मागील महिन्यात, या संस्थेच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 24 ते 36 गावांमध्ये जुन ते सप्टेंबर दरम्यान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या तडाख्याला सामोरे जावे लागेल असे सांगितले जात होते. या अंदाजाला पाठिंबा देत महारष्ट्रासोबतच मध्य भारतात पश्चिम गुजरातमध्ये देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. प्रशांत महासागरात उष्णतेच्या लाटांमुळे एल निनो ही परिस्थिती निर्मण होते ज्याचा प्रभाव दक्षिण पश्चिमी मान्सून वार्यावर झाल्याने जगभरात पावसावर परिणाम होऊ शकतो.