Aircraft (Image Credit - ANI X)

भारतातील एका एयरलाइन्स कंपनी द्वारा चालविण्यात येणाऱ्या बोईंग 737 मॅक्स (Boeing 737 Max) विमानाचा काही भाग गायब असल्याचे आढळल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. अलास्का एअरलाइन्स (Alaska Airlines) द्वारे चालविल्या जाणाऱ्या एका विमानाची खिडकी हवेतच उघडल्याने त्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले. ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली असली तरी जगभरातील विमान प्रवाशांच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीववर भारतातील एयरलाइन्स कंपनीद्वारा चालविल्या जाणाऱ्या विमानांच्या ताफ्यातील बोईंग 737 मॅक्स विमानांची सुरक्षीतता तपासली जात होती. ही तपासणी करताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एका विमानातील काही भाग गायब असल्याचा अहवाल दिला.

विमानांच्या सुरक्षेची छाननी

डिजीसीएच्या अहवालाच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, विमान वाहतूक नियामक डीजीसीएने मंगळवारी सांगितले की, अमेरिकन एरोस्पेस दिग्गज कंपनीने जगभरातील जवळपास सर्वांची विमान कंपन्यांच्या विमानांच्या सुरक्षेची छाननी करण्यासाठी अवाहन केले. त्यानुसार 737 Max Airplanes तपासणी करण्यात आली. या प्रकारातील जवळपास 1,300 पेक्षा जास्त विमाने वापरात असून ती सक्रीय आहेत. ज्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली. (हेही वाचा, Airplane window blows out Mid-Air: विमानाची खिडकी हवेतच उघडली, काय घडले पुढे? (Watch Video))

भारतामध्ये 737 मॅक्स विमाने सक्रीय असलेल्या कंपन्या आणि त्यांच्याकडील संख्या

  • Akasa Air-22
  • SpiceJet-09
  • Air India Express- 09

737 मॅक्स विमानांपैकी 39 विमानांची तपासणी पूर्ण

देशातील एकूण चाळीस 737 मॅक्स विमानांपैकी 39 विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे. ही सर्व विमाने सुस्थितीत आहेत. त्यांच्या तपासणीत काहीही निष्पन्न झाले नाही. केवळ एका विमानात काही समस्या आढळून आल्या. बोईंगने शिफारस केल्यानुसार सदर विमानात सुधारात्मक कारवाई करण्यात आली असल्याची पुष्टी DGCA आपल्या अहवालात केली आहे. प्राप्त माहितीनुसार, DGCA ने विशेषत: भारत नोंदणीकृत 737 मॅक्स 8 विमानांची तपासणी सोमवारी सुरू केली होती. (हेही वाचा, Air Asia Flight Emergency Landing: थोडक्यात बचावले 168 प्रवाशांचे प्राण, एअर एशियाच्या विमानाचे कोचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)

अलास्का एअरलाइन्सच्या विमानाच्या नुकत्याच झालेल्या आणीबाणीच्या लँडिंगमुळे जगभर विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक म्हणजे अलास्का कंपनीचे हे विमान 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करत होते. या विमानाची काच अचानक तडकली किंवा फुटली. ज्यामुळे बाहेरील हवा थेट विमानात घुसली. ज्यामुळे विमानातील प्रवाशांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे हे विमान अतिशय तातडीने उतरविण्यात आले. विमानाचे तातडीने लँडींग करण्या आल्याने संभाव्य धोका टळला असला तरी जगभरातील विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र ऐरणीवर आला.