Delhi Shocker: घरात सापडले आई आणि दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह, दिल्लीत नेमकं काय झाल?
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Delhi Shocker: दिल्लीत एका महिलेने दोन पोटच्या मुलांची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर तीन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तिघांचे मृतदेह राहत्या घरात सापडले आहे. महिलेने प्रथम मुलांचे मनगट कापले त्यानंतर स्वत:चे मनगट कापले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतला. त्यांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांत कार्यरत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये कॉन्स्टेबल असलेल्या जगेंद्र शर्मा यांची पत्नी आहे. हत्येचे आणि आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्या आणि हत्येची माहिती समोर आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीची हत्या पती आणि सासूने केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे.