Punjab: पंजाबच्या मोगा (Moga) जिल्ह्यात एका मेडिकल दुकानात दरोडाखोरांचा हल्ला झाला. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी १८ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना दुनेके परिसरातील एका मेडिकल दुकानात घडली. दरोडेखोर मोबाईल आणि पैसे घेऊन फरार झाले. (हेही वाचा- उशीर झाल्यामुळे ग्राहकाकडून शिवीगाळ, फूड डिलिव्हरी बॉयची आत्महत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सांयकाळी दुनेके परिसरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये दरोडेखोरांनी हल्ला केला. चार ते पाच पुरुषांनी धारधार शस्रासह दुकानात प्रवेश केला. धाराधार शस्त्राने दरोडेखोरांनी दुकान मालकाला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हल्ला करत दुकानातील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळून गेले.
घटनेचा सीसीटीव्ही फुटेज
VIDEO | A medical shop owner was brutally attacked by four armed assailants in Punjab's Moga on Wednesday (September 18) in an alleged loot attempt. The incident was caught on CCTV installed inside the shop.
(Source: Third Party) pic.twitter.com/udG75zDsyM
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2024
या हल्ल्यात राजेश कुमार नावाचा तरुण जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या डोक्याला १९ टाके पडल्याचे माहिती आहे. या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, दोन मोटारसायकलवरून चार ते पाच जण तोंड झाकून आले होते. त्यांनी दुकानात बसलेल्या तरुणावर हल्ला केला. लाठ्या काठीने तरुणावर हल्ला केला. दुकानातील पैसे आणि तरुणाचा मोबाईल घेऊन पळून गेले. या घटनेनंतर पीडित तरुणाने आरोपींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.