Jabalpur Shocker: मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) परिसरात दोन भावाने एका कर्ज वसूली एंजटची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुचाकीचा हप्ता वसूली करण्यासाठी आलेल्या एजंटची हत्या केली. ही घटना मंगळवारी संजवनी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुगव्हाण गावाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केले आहे. हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- मंदिरात मुलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी तामिळनाडूतील 70 वर्षीय पुजाऱ्याला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, अमन चौधरी आणि उदय चौधरी असं आरोपींची नावे आहे. मंगळवारी परिसरात एक मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपींचा शोध घेतला. राहुल असं मृताचे नाव होते. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावात चौकशी केली त्यावेळीस अमन चौधरी आणि उदय चौधरी या दोन संशयितांची नावे समोर आली.
पोलिसांनी दोघांची चौकशी केली त्यावेळीस गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीतून असं समोर आले की, दोघांन्ही हत्यावर दुचाकी घेतली होती. आर्थिक अडचणींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून दुचाकीचा हप्ता भरला गेला नव्हता.
आरोपींनी एंजटची काठीने मारहाण करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. राहुलचा मृतदेह जंगल परिसरात फेकण्यात आला. आरोपींविरुध्दात संजवनी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.