Online Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

वर्क फ्रॉम होम (Work-From-Home), पार्ट टाईम जॉब्स (Part-Time Jobs) यांसारखी आमिषं दाखवून झालेल्या ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) प्रकारात भारतीयांना तब्बल 10,319 कोटी रुपयांना गंडा घातला गेल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. उल्लेखनिय असे की, एप्रील 2021 ते 31 डिसेंबर 2023 या जवळपास 28 महिन्यांमध्ये हा प्रकार घडला. देशामध्ये पाठिमागील काही महिन्यांमध्ये सायबर क्राईम वाढले असल्याचे दिसून येते. दरम्यान, नागरिकांनी वेळीच सायबर पोलिसांची मदत घेतल्यामुळे एकूण ऑनलाईन घोटाळ्यातील जवळपास 1,121 कोटी रुपये वसूल होऊ शकले आहे. टक्केवारीत सांगायचे तर हा आकडा जवळपास 9-10% इतका आहे.

CFCFRMS मुळे नागरिकांना ऑनलाईन घोटाळ्यांपासून काहीसा दिलासा

इंडियन सायबर कोऑर्डिनेशन सेंटर (Indian Cyber Coordination Centre) सीईओ राजेश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, एप्रिल 2021 ते डिसेंबर  2023) नागरिक आर्थिक सायबर फसवणूक अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली (CFCFRMS) आणि '1930' आर्थिक सायबर फसवणूक हेल्पलाइनद्वारे वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे अनेक नागरिकांना ऑनलाईन घोटाळ्यांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पीडितांना त्यांचे पैसे परत मिळण्यास विलंब होते आहे. हे मान्य असले तरी, CFCFRMS आणि '1930' हेल्पलाइनचा आतापर्यंत 4.3 लाख पीडितांना फायदा झाला आहे. ऑनलाईन  फ्रॉड रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि प्रणाली निर्माण केलीजात आहे. येत्या काही महिन्यांतच त्याबातब सविस्तर माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Cyber Crime News Pune: पुण्यात बोकाळले सायबर भामटे, आठ महिन्यांत 20 कोटींहून अधिक रकमेवर डल्ला)

डिजिटल जाहिराती, ऑनलाइन मेसेंजरचे चॅनेल आणि बल्क एसएमएसद्वारे फसवणूक

राजेश कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, वर्क फ्रॉम होम (WFH) किंवा अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांमुळे देशात सर्वाधिक सायबर क्राईमची  नोंद झाली आहे. त्यासोबतच 2023 मध्ये बेकायदेशीर कर्ज देणारी अॅप्स यांमुळेही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. घोटाळेबाज मुख्यतः डिजिटल जाहिराती, ऑनलाइन मेसेंजरचे चॅनेल आणि बल्क एसएमएसद्वारे पीडितांपर्यंत पोहोचतात, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbai Cyber Police: बायकोपुढे शायनिंग मारण्यासाठी मुंबई पोलिसांची पासपोर्ट पडताळणी यंत्रणा हॅक, उचापतखोर नवऱ्यास अटक)

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी आणि आपली ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी बेकायदेशीर कर्ज देणारी अॅप्स वापरु नयेत. आपल्या मोबाईलवर आलेला कोणताही ओटीपी इतरांसोबत शेअर करु नये, याशिवाय व्हाट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम किंवा तत्सम सोशल मीडिया अकाऊंटवरु आलेल्या कोणत्याही अनोळखी आणि संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका. फसवणुकीची तक्रार येते तेव्हा आम्ही त्यांच्यावर बंदी घालतो आणि टॅप करत असतो. मात्र, ग्राहकांनी त्यासाठी तक्रार करण्याची काळजी घेतली पाहिजे, असेही राजेश कुमार म्हणाले. (हेही वाचा-पार्ट टाईम जॉबच्या आहारी गेलेल्या तरुणाला 61 लाखांचा गंडा,)

सायबर गुन्हेगारांविरोधात लढण्यासाठी भारत सरकार सक्षम भूमिका घेते आहे. असा गुन्हेगारांची माहिती सरकार इतर देशांच्या सरकारांनाही देत असते. नागरिकांची फसवणूक करणारी ही अॅप्स मोठ्या प्रमाणावर चीन, कंबोडिया, म्यानमार आणि इतर देशांमध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत आम्ही 595 अॅप्स ब्लॉक केली आहेत. जी संशयास्पद कामांमध्ये गुंतलेले होते. आम्ही RBI द्वारे 395 झटपट कर्ज अॅप्स सूचीबद्ध केले आहेत. Google आणि Facebook ला संशयास्पद अॅप्सचा अहवाल देणे, याबाबत आम्ही तातडीने कारवाई करत असतो असेही राजेश कुमार म्हणाले.