Bengaluru Cyber Crime: पार्ट टाईम जॉबच्या आहारी गेलेल्या तरुणाला 61 लाखांचा गंडा, बंगळुरुमधील घटना
Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

Bengaluru Cyber Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. सायबर क्राईममुळे (Cyber Crime) लोकांची फसवणूक करून लाखो- करोडो रुपयांचा गंडा लावला जातो. अशाच एक प्रकार बंगळुरु मध्ये घडला आहे. एका व्यक्तीला टेलिग्राम (Telegram) वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित व्यक्तीला 61 लाख रुपयांची गंडा लागल्याची माहिती मिळाली आहे.

अश्या प्रकारे केली फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारामधून व्यक्तीला 61 लाख रुपयांची फसवणू झाली. याची सुरुवात सोशल मीडियाच्या टेलिग्रामवरील मेसेजने झाली. बंगळुरुमध्ये राहणारा उदय उल्लास हा 41 वर्षाचा आहे. तो सोशल मीडियावर शेअर बाजारातील ट्रेंडस आणि स्टॉकबाबत माहिती घ्यायचे. एक दिवस एका अज्ञात महिलेने पार्ट टाईम नोकरीचा ऑफर दिली  होती. या महिलेने पीडिताला लिंक पाठवली होती.सुरुवातीला महिलेने पीडित व्यक्तीला 20 लाख रुपयांचे आमिष दाखवलं, त्यानंतर त्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितली. (हेही वाचा- मुंबईतील वृद्ध जोडप्याची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक;

काही दिवसांनी ही रक्कम त्याचा खात्यात आले पण जेव्हा ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रक्कम निघाली नाही, महिलेचा खेळ उदयाला समजला. त्याचा क्रेडिट स्कोर कमी असल्याने त्याला ही रक्कम काढता येणार नाही आणि त्यानंतर महिलेने पीडित व्यक्तीकडून आणखी पैशांची मागणी केली. दरम्यान पीडिताला एका चॅनलकडून सायबर गुन्ह्याची माहिती मिळाली, मात्र तो पर्यंत उशीर झाल्यामुळे उदयच्या खात्यातून 61,58 लाखांची फसवणू झाल्याचे उघडकीस आले.त्यानंतर  या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.