Unemployment | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Jobs And Financial Crisis: जगभरातील अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील जाणकार मंडळी इशारा देत आहेत की, कोरना व्हायरस संकटामुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण होईल. भारतालाही याचा मोठा फटका बसेल, असा इशारा ख्यातनाम अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी दिला आहे. अनेक मान्यवर सांगत आहेत की, या काळात आर्थिक मंदी आल्यास अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. अशा स्थतित तुमच्याही नोगरीवर गदा आली. तुम्ही जॉबलेस म्हणजेच बेकार झाला तर घाबरु नका. आतापासूनच काळजी घ्या. म्हणजे पुढे काळजी करण्याची वेळ येणार नाही.

नोकरी जाण्याचा संभाव्य धोका विचारात घेऊन काय कराल?

आणीबाणी निधी (Emergency Fund)

संकट असो अथवा नसो. नोकरी करणारा कोणताही व्यक्ती नेहमी अस्थिरच असतो. त्यामुळे संभाव्य धोका गृहीत धरुन आणिबानी निधी म्हणजे Emergency Fund सज्ज ठेवा. त्यासाठी नेहमीच्या कमाईतून थोडा थोडा हिस्सा बाजूला काढत चला. अजूनही वेळ गेलेली नाही. जेव्हा नोकरी गमावण्याची वेळ येते तेव्हा हा पैसा कामी येतो. यातून मुलांच्या शाळेची फी, कर्जाचे हाप्ते, घरभाडे, औषधं, किरकोळ वैद्यकीय खर्ज आदी गोष्टी सांभाळता येतात. कोणत्याही नोकरीशिवया किमा 6 महिने आपले घर चालू शकेल इतकी ही रक्कम असावी.

मेडिक्लेम पॉलिसी आवश्यक

आपत्कालीन स्थिती नोकरी गेली आणि काही वैद्यकीय खर्च उद्भवला तर गोंधळ उडू शकतो. म्हणूनच अशा वेळी मेडिक्लेम पॉलिसी आगोदरच घेऊन ठेवली असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या कुटुंबात कमीत कमी 4 सदस्य आहेत तर, आपण कमीत कमी 5 लाख रुपयांची मेडीकल पॉलिसी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक 5 वर्षांनी आपली मेडीकल पॉलीस टॉप-अप करणे आवश्यक आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकट तोडणार नोकऱ्यांचा लचका, बेरोजागारी वाढणार, प्रत्येक चारपैकी एक जण होणार बेकार- सीएमआयई)

मासिक खर्चाबाबत नियोजन करा

जर आपण आर्थिक टंचाईचा सामना करत असाल तर महिन्याच्या खर्चाचे नियोजन करा. यात किरना माल, हाप्ते, प्रवास, मुलांची शाळा यांसाख्या गोष्टींचा समावेश करा. एक आकडा नक्की करा आणि तेवढाच खर्च करा. खर्चावर प्रचंड मर्यादा घाला. खास करुन अनावश्यक वस्तू, मनोरंजन यांवरील खर्च टाळा. शॉपिंग शक्यतो नकोच. (हेही वाचा, Coronavirus: रघुराम राजन म्हणतात देशावर इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचे सावट)

कर्जाचे हाप्ते थकवू नका

कोणत्याही स्थितीत कर्जांचे हाप्ते थकवू नका. आपण बेरोजगार असला तरीही कर्जाचा हाप्ता थकणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. आपल्याकडे पुरेशी गुंतवणूक नसेल तर हाप्ता टाळण्यापूर्वी किमान बँक व्यवस्थापनाशी तसे बोलून घ्या. तुमच्या कर्जाचे हाप्ते तुम्ही वेळेत भरले नाहीत तर, तुमचे रेकॉर्ड खराब होऊ शकते. ज्यामुळे आपल्यासोबत भविष्यात व्यवहार करण्यासाठी बँका सहसा तयार होणार नाहीत. (हेही वाचा, कोरोना विषाणूमुळे सात मोठ्या शहरांमध्ये स्वस्त होणार घरे; मालमत्तांची विक्री 35 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता)

नोकरी म्हटलं की ती जाण्याची टांगती तलवार नेहमीच आली. पण, म्हणून काही घाबरुन जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे वेळीच योग्य नियोजन करा. भविष्यातील संभाव्य धोके ओळखा आणि टेन्शन फ्री आयुष्य जगा.