Photo Credit- X

Government Job: महिला व बालविकास विभागात नोकर भरती केली जाणार (Department of Women and Child Welfare) आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आणि संरक्षण आयोगावर ही भरती केली जाणार आहे. एकूण 7 रिक्त पदांवर ही भरती (Recruitment) केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे असावी. अध्यक्ष पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बालकांच्या कल्याण व विकासाशी निगडीत काम केलेले असावे. सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने याआधी दोन वेळा अध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम केलेले असावे. महिला व बालविकास विभागातील या भरतीची माहिती https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य- पुणे 1 येथे पाठवायचा आहे.