Coronavirus: रघुराम राजन म्हणतात देशावर इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचे सावट
Raghuram Rajan | (Photo Credit: PTI)

Coronavirus in India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला गंभीर इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस संकटाची व्याप्ती पाहता भारताच्या इतिसाहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचे ढग अर्थव्यवस्थेवर जमू लागले आहेत. हा भारती अर्थव्यवस्थेतील सर्वात नाजूक क्षण आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने मतभेद विसरुन विरोधी पक्ष आणि देशातील विविध क्षेत्रांती मान्यवरांची मदत घ्यायला पाहिजे असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

रघुराम राजन यांनी लिंक्डइनवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, या नाजूक काळात गरीबांवर अधिक खर्च करणे आवश्यक आहे. अमेरिका किंवा यूरोप आदी देशांच्या रेटींगकडे पाहिले तर संभाव्य मंदी टाळण्यासाठी ते जीडीपीशिवाय 10% खर्च करु शकतात. पण, आपला विचार करता आपण आगोदरच महसूली तूट सहन करत आहोत. त्यात आता अधिक खर्च कारावा लागणा आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये रघुराम राजन पुढे लिहितात की, 2008/09 या काळात जेव्हा आर्थिक तूट आल्याने मागणी प्रचंड प्रमाणात घटली होती. मात्र, तेव्हा कामगार कामावर जात होते आणि आर्थित स्थितीही प्रचंड प्रमाणावर मजबूत होती. आज आम्ही जेव्हा कोरोना व्हायरस महासाथीविरुद्ध लढतो आहोत. ते पाहता यातील ते पाहता बऱ्याच गोष्टी कठीण आहेत. परंतू निराश होण्याची काहीच आवश्यकता नाही. भारत या स्थितीतून बाहेर पडू शकतो. (हेही वाचा, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा; 'या' सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते मोठे नुकसान)

देशाला प्रदीर्घ काळासाठी बंद अवस्थेत ठेवणे कठीण आहे. त्यामुळे भारताला हाही विचार करावा लागेल की, संक्रमन टाळून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी काय करावे लागेल, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.